धोत्रेत तरुणाच्या खूनप्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धोत्रेत तरुणाच्या खूनप्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

जमीन दुसर्‍याला का विकली? मला का सांगितलं नाही या कारणावरून तालुक्यातील धोत्रे येथील रहिवासी अण्णासाहेब मारुती चंदने (वय 40 वर्षे) यांना नऊ आरोपींनी मारहाण करून त्यांचा खून केला. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 9 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवार दि. 17 मे रोजी मयत आप्पासाहेब मारुती चंदने हे आपल्या घरासमोर असतांना गैरकायद्याची मंडळी जमवून हातात लोखंडी रॉड, काठ्या घेऊन घरासमोर येऊन आरोपी बाबासाहेब राधाकिसन चंदने हा मयतास म्हणाला की तुझी जमीन दुसर्‍याला का विकली. ती मला का नाही दिली. मी घेतली असती, असे म्हणून आरोपी बाबासाहेब राधाकिसन चंदने, भूषण बाबासाहेब चंदने, सोमनाथ बाबासाहेब चंदने, प्रताप गणेश काटे यांनी काठीने पाठीवर पोटावर हातावर पायावर मानेवर, व आरोपी आकाश विकास चंदने, सुनिता गणपत चंदने, गौरव गणपत चंदने, भाऊसाहेब निवृत्ती काटे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी केली व आरोपी विलास कडू चंदने याने मयताच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून गंभीर दुखापत करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात अण्णासाहेब मारुती चंदने यांचा मृत्यू झाला.

मयताच्या पत्नी वनिता अण्णासाहेब चंदने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील नऊ आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.न. 163/ 2021 भादंवि कलम 302, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com