‘धूमस्टाईल’च्या घटना रोखण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथके

एसपींचे आदेश: अनुभवी पोलिसांचा सहभाग
‘धूमस्टाईल’च्या घटना रोखण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथके

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरासह जिल्ह्यात धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेणे, पैशाच्या बॅग चोरीचे प्रकार वाढले आहेत. घडलेल्या घटनांची उकल करण्यासाठी व अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके स्थापन केले आहेत.

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे हे या पथकांचे नेतृत्व करणार आहेत. विशेष म्हणजे या पथकांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेत अनेक वर्षे काम केलेल्या आणि गुन्ह्यांची उकल करण्याचा हातखंडा असलेले सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, सहाय्यक फौजदार संजय खंडागळे, पोलीस हवालदार बापूसाहेब फोलाणे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मध्यंतरी नगर शहर आणि परिसरात पायी जात असलेल्या महिलांच्या गळ्यातले दागिने धूमस्टाईलने ओरबाडून नेणे आणि नागरिकांच्या हातातली पैशांची बॅग हिसका देऊन नेण्याचे प्रकार घडले होते. या प्रकाराचे लोण ग्रामीण भागातही गेले आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी दोन स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com