धुमस्टाईल चोरी करणारे दोघे जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
धुमस्टाईल चोरी करणारे दोघे जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुचाकीवरून (Bike) येऊन धुमस्टाईलने नागरिकांच्या हातातील मोबाईल (Mobile) पळविणार्‍या दोन आरोपींना (Accused) पोलिसांनी जेरबंद (Police Arrested) केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. अब्दुल महेंदरदीन खान व सुखचेन केसरसिंग (रा. छत्रपतीनगर, तपोवन, सावेडी) अशी अटक (Arrested) केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पारनेर (Parner) येथील कोमल दत्तात्रय जाधव, या घरी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत रस्त्यावर उभ्या असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांनी त्यांच्या हातातील मोबाईल (Mobile) हिसकावून नेला होता. जिल्ह्यात असे प्रकार वाढत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके (LCB PI Anil Katake) यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

सदरचा गुन्हा अब्दुल खान (रा. तपोवन, नगर) याने केल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार संदीप पवार, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे व संभाजी कोतकर यांनी तपोवन येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला. आरोपी खान हा तपोवन येथील छत्रपती नगर येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

सदरचा गुन्हा त्याचा साथीदार सुखचेन केसरसिंग (रा. छत्रपती नगर, तपोवन) याच्यासह केल्याची कबुली त्याने दिली. त्यानुसार सुखचेन केसरसिंग यास पथकाने ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्ह्यातील मोबाईल जप्त (Seized) करण्यात आला. आरोपींना पारनेर पोलीस ठाण्यात (Parner Police Station) हजर करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com