कर्जत वकिल संघ अध्यक्षपदी राणे; चुरशीच्या निवडणुकीत मताधिक्याने

राणे यांच्या पॅनलचा विजय
कर्जत वकिल संघ अध्यक्षपदी राणे; चुरशीच्या निवडणुकीत मताधिक्याने

कर्जत (प्रतिनिधी)

कर्जत तालुका वकील संघाच्या पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी अ‍ॅड. धनराज राणे, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. सचिन रेणुकर आणि सचिवपदी अ‍ॅड. संजीवन गायकवाड यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला.

दोन वर्षापूर्वी पहिल्यांदा कर्जत तालुका वकील संघाची निवडणूक झाली होती. यावर्षी कार्यकाळ संपल्याने नुकताच निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. गोपाळराव कापसे व अ‍ॅड. अनुभुले यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. निवडणुकीमध्ये एकूण तीन पॅनल झाले होते. त्यापैकी रवींद्रनाथ भोसले, अ‍ॅड. भिमराव शेळके व अ‍ॅड. बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने आघाडी घेत यापूर्वीच महिला सचिव अ‍ॅड. सुनिता बागल, खजिनदार अ‍ॅड. विनायक जाधव व ग्रंथालय सचिव अ‍ॅड. प्रविण पवार यांची बिनविरोध निवड केली होती. त्यानंतर निवडणूकीतून प्रचारामध्ये आघाडी घेत अध्यक्षपदासाठी अ‍ॅड.धनराज राणे यांनी प्रतिस्पर्धी अ‍ॅड. संदीप धोदाड व अ‍ॅड. हरिचंद्र महामुनी यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव करत विजय प्राप्त केला. उपाध्यक्षपदीही याच पॅनलचे अ‍ॅड. सचिन रेणूकर विजयी झाले. मात्र प्रतिस्पर्धी पॅनलचे सचिव पदाचे उमेदवार अँड. संजीवन गायकवाड यांचा अवघ्या एका मताने विजय झाला.

निवडणूक योग्य रितीने पार पडण्यासाठी अ‍ॅड. दिपक भंडारी, अ‍ॅड.नामदेव खरात, अ‍ॅड. सुरेश वाकडे, अ‍ॅड. नवनाथ फोंडे, अ‍ॅड. विठ्ठ्लराव गवारे, अ‍ॅड. युवराज राजेभोसले, अ‍ॅड. दिपक भोसले, अ‍ॅड.राहुल जाधव, अ‍ॅड. गजेंद्र बागल, अअनिल म्हेत्रे, अ‍ॅड. संग्राम ढेरे, अ‍ॅड. नितीन जगताप, अ‍ॅड.आनंद साळवे,अ‍ॅड. भालचंद्र पिसे, अ‍ॅड. संजय गवारे, अ‍ॅड.रामदास पुराणे, अ‍ॅड.अशोक कोठारी, अ‍ॅड. प्रतिभा रेणूकर आदींनी प्रयत्न केले. निवडून आलेल्या सर्व पदाधिकार्‍यांचे आमदार रोहीत पवार, खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, बळीराम आण्णा यादव, अशोकराव खेडकर, प्रवीण घुले, उदयोजक दिपकशेठ शिंदे, सरपंच विजय तोरडमल, सुनील शेलार, प्रसाद ढोकरीकर, सुधीर यादव, दिपक काळे, प्रसाद कानगुडे, नितीन तोरडमल, किरण पाटील यांनी अभिनंदन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com