धनगर समाजाचा नेवासाफाटा येथे रास्तारोको

धनगर समाजाचा नेवासाफाटा येथे रास्तारोको

नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata

धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात सरकारने केवळ आश्वासनावर भागविले असल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावर नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात समाजाच्या वतीने शनिवारी सकाळी 11 वाजता एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित आंदोलकांनी सरकारला राज्यभर आंदोलने करण्याचा इशारा दिला.

आरक्षण वेळेत दिले नाहीतर तर रक्तपात होईल, आरक्षणाला विरोध करणार्‍या सरकारला जागा दाखवू व संपुर्ण राज्यभर आंदोलन करु अशा भाषेत धनगर समाजाच्या नेत्यांनी गर्भित इशारा दिला. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंत सेना व इतर संघटनांनी मोर्चे काढले, आंदोलने केली, सरकारचे लक्ष वेधले असे असतानाही सरकारने केवळ समाज बांधवाना आश्वासनांची खिरापत दिली.

आंदोलनाला धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘येळकोट..यळकोट जय मल्हार’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. पोलीस निरिक्षक शिवाजीराव डोईफोडे व सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुरेश शिंदे व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com