धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार - ना. विखे

धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार - ना. विखे

धनगर समाज संघर्ष समिती आणि मेंढपाळ विकास मंच शिष्टमंडळाची बैठक

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

धनगर समाज संघर्ष समिती आणि मेंढपाळ विकास मंच यांच्या शिष्टमंडळाने वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन विखे पाटील यांना दिले. दरम्यान शिष्टमंडळाशी सविस्तर प्राथमिक चर्चा करून विखे पाटील यांनी विषय समजून घेतले. तसेच लवकरच याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर करत आश्वस्त केले.

यावेळी खा. डॉ. विकास महात्मे, माजी आमदार रामराव वडकुते, मेंढपाळ विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष संतोष महात्मे, मेंढपाळ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालिका पल्लवी लांडे, संचालक प्रवीण भुजाडे यांच्यासह पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com