धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या

धनगर समाज आरक्षण कृती समितीचे तहसीलदारांना निवेदन
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण देऊन योग्य तो न्याय समाजाला द्यावा यासाठी सकल धनगर समाज आरक्षण

कृती समितीच्यावतीने तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, धनगर समाजाने एसटी मध्ये समावेश करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने व मोर्चे काढले. या पूर्वीच्या सरकारने सकारात्मक विचार करून पाठपुरावा केला परंतु तरीही समाजाच्या आरक्षणाबाबत कोणत्याही हालचाली झालेल्या दिसत नाहीत.

आज धनगर समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला असून तरी महाविकास आघाडी सरकारने धनगर समाजाच्या भावना समजून घेऊन आरक्षणाबाबत सकारात्मक विचार करून योग्य त्या हालचाली कराव्यात अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा विचार करील. या सर्व बाबींना शासन जबाबदार असेल असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी नामदेवराव खंडागळे, लक्ष्मण दाणे, शशिकांत मतकर, किशोर भुसारी, किशोर विखे, गोरक्षनाथ शेंडगे, विठ्ठल डोईफोडे, नामदेव खोसे, शंकर शिंदे, डॉ.दाणे, आबासाहेब पंडित, आदेश मतकर, बाबा गवळी, बाबासाहेब भगत, बाळासाहेब वाकडे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com