अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

धनगर समाजाला एसटी आरक्षणाच्या सवलती मिळण्यासह इतर विविध मागण्यांसाठी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य,

जिल्हा अहमदनगरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. धनगर समाजाला एसटी आरक्षणाच्या सवलती देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आनण्याची मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनात दादाभाऊ चितळकर, शांतीलाल कोपनर, भानुदास हाके, अशोक चोरमले, निशांत दातीर, डॉ. मीनाक्षी करंडे, युवराज हाके, शहादेव गुंजाळ, सुभाष पाचारणे, सखाराम सरग, महेंद्र सोलाट, विलास जांभळकर, महेश काटमोरे, देविदास कोपनर, शिवाजी नवले, विठ्ठलराव वाघमोडे, श्रीकांत बाचकर आदिंसह धनगर समाज बांधव काठी, घोंगडी, फेटा परिधान करुन सहभागी झाले होते.

धनगर समाजाला एसटी आरक्षणामध्ये समाविष्ट करून महाराष्ट्र सरकारने विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये ठराव करून धनगर व धनगड हे एकच आहेत अशी केंद्र सरकारला शिफारस करावी, केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावून अध्यादेश काढून आरक्षण देण्यात यावे किंवा राष्ट्रपती यांनी वटहुकूम काढून धनगर समाजाला आरक्षण द्यावे, महाराष्ट्रातील धनगर समाज गेल्या 65 वर्षापासून एसटी आरक्षणाची मागणी करीत आहे.

तरी याची जनहितयाचिका उच्च न्यायालयात प्रलंबीत असून, राज्य सरकारच्या वतीने ही याचिका फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर न्याय द्यावा, धनगर समाजाच्या पदोन्नतीस पात्र असलेल्यांना एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात यावी, पोलीस मेगा भरती तत्काळ सुरू करण्यात यावी, धनगर समाजाच्या उन्नतीसाठी मागील सरकारने मंजूर केलेला 1 हजार कोटी रुपयाचा निधी तात्काळ वितरित करुन धनगर समाजाला न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.