धामोरीत सात दिवसांचा जनता कर्फ्यू

धामोरीत सात दिवसांचा जनता कर्फ्यू

धामोरी |वार्ताहर| Dhamori

कोपरगाव तालुक्यातील धामोरी परिसरात रुग्ण संख्येत वाढ होत असून अनेक रुग्ण करोनामुळे दगावल्याने. धामोरी गावात करोना रुग्णाची वाढ होऊ नये, या उद्देशाने करोनाची साखळी खंडीत करण्यासाठी दि. 4 मे ते 10 मे 2021 या दरम्यान गावातील दवाखाने व मेडिकल सेवा वगळता इतर सर्व आस्थापने दुकाने (किराणा दुकान, भाजीपाला, फळे व इतर सर्व दुकाने 100 टक्के) बंद राहतील असा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या कुटुंबात करोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहे. परंतु ते घरीच उपचार घेत आहे त्यांनी त्वरित कोविड सेंटर मध्ये विलीनीकरण घेऊन तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे. घरात उपचार घेत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. यावेळी गावातील डॉक्टर, मेडिकल स्टोअर्स, सर्व दुकानदार यांना गावात करोना रुग्णाची वाढ होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना व निवेदन सुचना करण्यात आलेल्या आहेत.

या सात दिवसांचा जनता कर्फ्यु कालावधीमध्ये विनाकारण घराबाहेर पडल्यास 500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. करोनाचा प्रादुर्भाव व मृत्यूचे थैमान थांबविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिस पाटील संगिता ताजणे यांनी केले आहे. याप्रसंगी कैलासराव माळी, अशोकराव भाकरे, उपसरपंच प्रभाकर मांजरे, विजय ताजणे, निवृत्ती शिंदे, डॉ. कृष्णाराव जगझाप, डॉ.रामदास जाधव, डॉ. गणेश बार्‍ेहाळे, डॉ. सोमनाथ म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य सुभाष आहिरे, बबन भाकरे, सतिष कोळपे, नंदकुमार माळी, नाजीम शेख, ग्रामसेवक तडवी, राजीव वेलजाळे व करोना दक्ष समिती सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com