धामोरी फाट्यावर गावठी दारू जप्त

धामोरी फाट्यावर गावठी दारू जप्त
File Photo

राहुरी |प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्यातील धामोरी फाटा येथे दि. 7 मे रोजी छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने 35 लिटर गावठी दारू जप्त करून राजेंद्र गिर्हे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दुपारी एक वाजे दरम्यान अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने तालुक्यातील धामोरी फाटा येथे एका दारूअड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. यावेळी 3 हजार 500 रुपये किंमतीची 35 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. तसेच बेकायदेशीर दारूविक्री करणारा आरोपी राजेंद्र मच्छिंद्र गिर्हे, रा. धामोरी फाटा, ता. राहुरी याच्या विरोधात पोलीस हवालदार रोहीत येमुल यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत गु.र.नं.व कलम - 359/2021 महाराष्ट्र दारुबंदी कायदा 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार बर्हाटे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com