धादवडवाडी येथे लोकसहभागातून वन्य प्राण्यांसाठी पाणवठा

धादवडवाडी येथे लोकसहभागातून वन्य प्राण्यांसाठी पाणवठा

घारगाव |वार्ताहर| Ghargav

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील धादवडवाडी येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून वन्यप्राण्यांसाठी जंगलातच पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पाणवठ्याची निर्मिती केली आहे. या पर्यावरणीय उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

माळेगाव पठार गावांतर्गत असलेल्या धादवडवाडी येथे मोठ्या प्रमाणात डोंगररांग आहे. मात्र, सध्या उन्हाळ्याचे कडक दिवस असल्याने जंगलामध्ये पिण्यासाठी पाणी नसल्याने मोर, बिबटे, तरस, लांडगे, हरीण आदी वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करतात. या डोंगराच्या शेजारून पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन गेलेली आहे.

त्या पाईपलाईनच्या मदतीने ग्रामस्थांनी लोकसहभागातून सिमेंटचा पाणवठा तयार केला आहे. यामुळे वन्यप्राण्यांची तहान भागून पर्यावरणाचा समतोल राहण्यास मदत होणार आहे. या उपक्रमासाठी सरपंच ज्ञानेश्वर पांडे, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ पांडे, सतीष क्षीरसागर, गोपीनाथ पांडे, विलास पांडे, विकास धादवड, नवनाथ गोसावी आदिंनी सहकार्य केले आहे.

धादवडवाडी परिसरात मोठ्या संख्येने मोर वास्तव्यास आहेत. हे मोर भक्ष्य व पाण्यासाठी थेट शेतातील पिकांवर ताव मारतात. तसेच मानवी वस्तीकडेही कूच करतात. त्यामुळे ग्रामस्थांनी वन्यप्राण्यांची वणवण थांबविण्यासाठी लोकसहभागातून पाणवठ्याची निर्मिती केली आहे.

- सतीष क्षीरसागर (शेतकरी)

Related Stories

No stories found.