
वीरगाव |वार्ताहर| Virgav
गेल्या सहा महिन्यापासून देवठाण येथील तलाठी कार्यालय नेहमी बंद असल्याने विद्यार्थी व शेतकर्यांचे हाल होत आहेत. या मनमानी कामकाजा विरोधात अकोले तालुक्यातील देवठाण येथील शेतकरी, विद्यार्थ्यी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी थेट तलाठी कार्यालयालाच टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून बर्याच वेळा तलाठी कार्यालय बंद असल्याने शेतकरी बांधवांना दाखले व उतारे मिळण्यास विलंब होत आहे. त्याचप्रमाणे तलाठी कार्यालयातून वेळेत आवश्यक कागदपत्रे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजात अडचणी निर्माण होतात.
कामगार तलाठी क्षेत्रीय भेटींना जात असताना कुठलीही सूचना सूचना फलकावर लिहिली जात नसल्याने ग्रामस्थांना हेलपाटे मारावे लागतात. आठवडाभरात कामकाजात सुधारणा न झाल्यास थेट तलाठी कार्यालयालाच टाळे ठोकण्याचा इशारा देवठाण ग्रामस्थांनी दिला आहे.
अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके यांचे नेतृत्वाखाली देवठाण ग्रामस्थांनी हे निवेदन दिले. यावेळी माजी सभापती सुहाा कर्डिले, देवठाण सोसायटीचे संचालक जालिंदर बोडके, महेश शेळके, परशराम शेळके, तुकाराम पाटोळे, दिनेश बोडके, महेश सोनवणे, दामोदर शेळके, बाबू दराडे, अशोक सोनवणे यांचेसहित देवठाण ग्रामस्थ हजर होते.