भक्तीपूर्ण वातावरणात उद्या बाप्पांचे आगमन

स्वागतासाठी पूजासाहित आणि फुलांची बाजारपेठ गजबजली
भक्तीपूर्ण वातावरणात उद्या बाप्पांचे आगमन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरात (Nagar City) गणरायाच्या स्वागतासाठी पूजा साहित्य (Pooja literature) आणि फुलांनी बाजारपेठ सजली आहे. बाप्पांच्या लाडक्या दूर्वा, जास्वंदांच्या फुलांसह नारळ, शमीची पाने, विड्याची पाने, आघाडा-केना यांची खरेदी करण्यासाठी गुरूवारी भाविकांची लगबग सुरू होती. त्याच्या जोडीला धूप, कापूर, सुवासिक उदबत्त्या (Incense), चंदन (Sandalwood) यांच्या विक्रीने प्रसन्न वातावरण निर्माण असून शुक्रवारी भक्तीपूर्ण वातावरणात लाडक्या श्रींचे आगमन होणार आहे.

गणपती बाप्पांच्या (Ganpati Bappa) पूजेत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या दूर्वा मोठ्या प्रमाणावर बाजारात आहेत. तसेच गणेशाला प्रिय असलेल्या जास्वंदांच्या फुलांचीही मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. त्याच्या जोडीला गुलाब, झेंडू, शेवंती, सोनचाफा ही फुलेही उपलब्ध झालेली आहेत. विड्याची पाने, शमीची पाने, आघाडा-केना यांचीही खरेदी नागरिक करत आहेत. प्राणप्रतिष्ठेसाठी लागणार्‍या पूजा साहित्याच्या विक्रीलाही नगरच्या बाजार पेठेत विक्रीला वेग आल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. तसेच हळद-कुंकू, गुलाल, बुक्का, धूप, अगरबत्ती (Agarbatti), अष्टगंध, कापूर, सुपार्‍या आदींचा समावेश आहे.

गणेशोत्सव (Ganeshotsav) हा अठरापगड जातीला आपलासा वाटणारा सण आहे. त्यामुळे करोनाची भीती असली तरी नागरिक खबरदारी घेऊन खरेदीसाठी येत आहेत. पूजा सामग्रीला सण-उत्सवाच्या काळातच मागणी असते. यंदाही बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने मागणी वाढल्याने व्यवसाय रुळावर येतो आहे, अशी आशावादी प्रतिक्रिया विविध व्यवसायिकांनी व्यक्त केली. नगर शहरात माळीवाडा (Maliwada), पाईप लाईन रोडला भिस्तबाग (Pipeline Road Bisatbag), प्रोफेसरचौक (Professor Chowk), श्रीराम चौक (Shriram Chowk) या परिसरात आणि एमआयडी (MIDC) भागात नागापूर (Nagapur) परिसरात खरेदीसाठी भाविकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाली. यासह बाप्पांच्या स्वागतासाठी विविध आकर्षक रंगाच्या माळांची दुकाने सजलेली आहेत.

श्रींच्या प्राणप्रतिष्ठेचा मुर्हूत

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे आज (दि.10) गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. यात गणेश प्रतिष्ठापनेसाठी सकाळी 11 वाजून 03 मिनिटांपासून ते 1 वाजून 33 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे.

प्रतिष्ठापनेसाठी लागणारे साहित्य

गणपतीची स्थापना करण्यासाठी चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्यांचे डहाळे, सुपार्‍या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्री, ताम्हण, समई, अक्षता, वस्त्र, जानवे, अष्टगंध, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपार्‍या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ यांची आवश्यकता राहणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com