श्रीक्षेत्र ताहाराबादला एकादशीनिमित्त भाविकांची वारी

श्रीक्षेत्र ताहाराबादला एकादशीनिमित्त भाविकांची वारी

ताहाराबाद (वार्ताहर) / Taharabad - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील प्रतिपंढरीत आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी श्रीसंत कवी महिपती महाराज व विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. वारकर्‍यांच्या मनामध्ये एक रुखरुख होती, पंढरपूरची वारी खंडित झाल्याची! त्यामुळे परिसरातील भाविकांनी ताहाराबाद क्षेत्री येऊन वारीचा आनंद द्विगुणित केला.

वारकर्‍यांबरोबर आषाढ सरींनाही दर्शनाचा मोह झाला. आषाढ सरी बरसत असतानाही भाविक दर्शनासाठी आतूर झाला होता. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत भाविकांनी दर्शन घेतले. पहाटे चार वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत भाविका़ंनी दर्शन घेतले. सालाबादप्रमाणे असलेली वारी खंडित करू नको. वृद्धापकाळात नेत्रांना तुझे स्वरूप पाहू दे. भरपूर पाऊस होऊ दे, बळीराजा सुखी ठेव व कोविड-19 चे उच्चाटन कर, असे साकडे भाविकांनी घातले. यावेळी देवस्थान विश्‍वस्त, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

श्रीसंत कवी महिपती महाराज पालखी पंढरपूर येथे नेण्यात आली होती. पोलीस प्रशासन व गावातील पदाधिकारी हजर होते. वारी खंडित झाल्यामुळे वारकर्‍यांचा सूर नाराजीचा होता. वारकर्‍यांची अपेक्षा आहे, वारी पूर्ववत चालू झाली पाहिजे. करोनामध्ये अनाथ झालेल्या मुलांना मदत करा, हीच खरी पंढरीची वारी ठरेल!

- रावसाहेब झावरे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com