देवळाली प्रवरात तरूणाची आत्महत्या
सार्वमत

देवळाली प्रवरात तरूणाची आत्महत्या

Arvind Arkhade

देवळाली प्रवरा|वार्ताहर|Devlali pravara

येथील 22 वर्षीय तरुणाने दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

संतोष रवींद्र वरघुडे (वय 22, रा. टाकळीमिया रस्ता, देवळाली प्रवरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. करोना लॉकडाऊनपूर्वी तो एका हॉटेलमध्ये मजुरी काम करीत होता. सध्या तो गवंड्याच्या हाताखाली काम करीत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे.

आत्महत्येचे कारण समजले नाही. राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com