देवळाली प्रवरा नगरपालिकेचे कोविड सेंटर तातडीने सुरू करा

देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमचे मुख्याधिकार्‍यांना साकडे
देवळाली प्रवरा नगरपालिकेचे कोविड सेंटर तातडीने सुरू करा

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

नगरपरिषदेचे कोविड सेंटर तात्काळ सुरू करा, अशी मागणी देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमच्या सदस्यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांची नगरपालिकेत भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी मेडिकल हेल्प टीमचे दत्तात्रय कडू, आप्पासाहेब ढुस, अमजद इनामदार, अनिस शेख, प्रशांत कराळे, ऋषीकेश संसारे, डॉ. संदीप कदम आदी उपस्थित होते.

दत्तात्रय कडू म्हणाले, गेल्या काही दिवसांत देवळाली प्रवरा शहरात कोविडचे रुग्ण पुन्हा आढळून येत असल्याने नगरपरिषदेने ते सुरू करत असलेले 100 ऑक्सीजन बेडचे कोविड सेंटर तातडीने सुरू करून रुग्णांची होणारी धावपळ व गैरसोय टाळावी. सहारा कोविड सेंटरमध्ये मेडिकल हेल्प टीमच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्तींनी बेड, मेडिकल साहित्य, पंखे आदी दान केले होते. आता सहारा बंद झाल्याने हे सर्व साहित्य नगरपरिषद सुरू करत असलेल्या मोफत कोविड सेंटरला देण्यासाठी हेल्प टीमने मुख्याधिकारी यांची भेट घेतली.

दरम्यान, कोविड सेंटरची तयारी पूर्ण होत आली असून शासनाचे आदेश येताच ते सुरू करण्यात येईल, असे मुख्याधिकारी यांनी सांगितले. निदान विलगीकरण कक्ष तातडीने सुरू करावा, अशीही आग्रही मागणी हेल्प टीमच्यावतीने करण्यात आली. देवळाली प्रवरा शहरात लसीकरण अत्यंत मंद गतीने होत असून नागरिकांवर इतर गावांत जाऊन लस घ्यावी लागत आहे. शहराची लोकसंख्या विचारात घेता लसीचा जास्तीचा साठा शहरास मिळावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकार्‍यांशी संपर्क करून त्यांना शहरातील परिस्थिती समजून सांगितली. त्यांनी लसीचा कोटा वाढवून देत असल्याचे आश्वासन दिले. गेले दोन-अडीच महिने कोविड रुग्णांना मदत करणार्‍या देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टीमच्या आप्पासाहेब ढुस, अमजद इनामदार, अनिस शेख, प्रशांत कराळे, ऋषीकेश संसारे, डॉ. संदीप कदम आदी सदस्यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com