माजी आमदार मुरकुटेंच्या ताब्यातील देवगाव सोसायटीत सत्तांतर

माजी आमदार मुरकुटेंच्या ताब्यातील देवगाव सोसायटीत सत्तांतर

नामदार गडाखांच्या अधिपत्याखालील शेतकरी विकास पॅनलचा सर्व जागांवर विजय

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या ताब्यात असलेल्या देवगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये सत्तांतर झाले असून जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाच्या लोकनेते स्व. मारूतराव घुले पाटील शेतकरी विकास पॅनेलने सर्व जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे.

नेवासा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या देवगाव सोसायटीची सत्ता आजपर्यंत भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाच्या ताब्यात होती. एकूण मतदान पात्र 1110 मतदार सभासद असलेल्या या सोसायटीच्या संचालक मंडळासाठी उमेदवारी अर्ज भरणेची मुदत 20 मे पर्यंत होती. या कालावधीत मुरकुटे गटाला एकही उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. परंतु ज्ञानदेव कारभारी पाडळे व त्यांच्या पत्नी चंद्रकला ज्ञानदेव पाडळे या दोघांचेच कर्जदार व महिला मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज राहिल्याने एकूण 10 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया करावी लागली. त्यामुळे दि.19 जून रोजी मतदान होऊन निकाल जाहीर करण्यात आला.

या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे भटके-विमुक्त, ओबीसी व अनुसूचित जाती मतदार संघातील तीन उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे सर्वंच्या सर्व 13 जागा या पॅनेलने जिंकलेल्या आहेत. त्यामुळे देवगाव सोसायटी संचालक मंडळावर नामदार गडाख यांना मानणार्‍या कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे.

उमेदवार व त्यांना पडलेली मते- सर्वसाधारण कर्जदार - विजयी- बाबानाथ कारभारी आगळे (634), गोरक्षनाथ आसाराम निकम (637), सुभाष विश्वनाथ निकम (649), ज्ञानदेव सिताराम निकम (635), बाबासाहेब गोवर्धन पाडळे (675), कुंदनमल शांतीलाल भंडारी (635), शिवाजी गोरक्षनाथ मोरे (657), नुरमहमंद शेखनुर शेख (587). पराभूत- चंद्रकला ज्ञानदेव पाडळे अपक्ष (325) व ज्ञानदेव कारभारी पाडळे अपक्ष (353).

महिला राखीव - विजयी- पार्वती मारूती ठोंबरे (655), व शारदा राधाकृष्ण शिंदे (604).पराभूत- चंद्रकला ज्ञानदेव पाडळे अपक्ष (307).

भटके विमुक्त - चंद्रभान अंबादास रोडगे (बिनविरोध) *अनुसूचित जाती- मच्छिंद्र योसेफ काळे (बिनविरोध). ओबीसी- सखाहरी कारभारी गायकवाड (बिनविरोध).

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाच्या लोकनेते स्व. मारूतराव घुले पाटील शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व माजी पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, महेश निकम, गोरक्षनाथ निकम, अशोक गुंदेचा, कचरदास गुंदेचा, प्रमोद शिंदे, श्री. आगळे, रावसाहेब निकम, सकाहरी आगळे, श्री. खान यांनी केले.

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना स्वत:च्या गावातील देवगाव सोसायटी निवडणुकीत उभे करण्यासाठी उमेदवार न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारांना फूस लावून अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवून सोसायटीची निवडणूक लादली. परंतु सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.

- महेश निकम, माजी उपसरपंच, देवगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com