महिलेच्या गळ्यातील चार तोळ्याचे गंठण ओरबाडले

File Photo
File Photo

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील देवगड फाटा (Devgad Phata) येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या महिलेच्या (Woman) गळ्यातील सोन्याचे 4 तोळ्याचे गंठण अज्ञात चोरट्यांनी (Chain Snatching) ओरबाडले. यातील तीन तोळ्याचा भाग चोरुन नेण्यात चोरटे (Thieves) यशस्वी झाले तर महिलेने गंठण घट्ट पकडून धरल्याने एकतोळ्याचा गंठणाचा भाग वाचवण्यात यश आले.

File Photo
घोडेगावात मोठा कलरपत्ती कांद्याला मिळाला 'हा' भाव

याबाबत सेवानिवृत्त बँक अधिकारी अंबादास दिगंबर गोसावी (वय 65), रा केडगाव (अ.नगर) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, आम्ही खासगी वाहनातून (एमएच 16 बीसी 0801) 11 ऑगस्ट रोजी जालना (Jalna) जिल्ह्यात देवदर्शनासाठी जावून अहमदनगरकडे (Ahmednagar) येत असताना चहा पिण्यासाठी देवगड फाटा येथील श्री दत्तकृपा हॉटेल येथे थांबलो होतो. माझी पत्नी प्रतिभा तसेच सोबतचे सर्वजण आमचे कडील गाडीतून खाली उतरलो.

File Photo
बसला टेम्पो धडकला; टायर पंक्चर काढणारा बसचालक ठार

त्यावेळी प्रतिभा तसेच जयश्री अरूण तडवळकर, रत्नमाला रविंद्र देशपांडे व रश्मी गोसावी अशा चौघीजणी लघुशंकेसाठी हॉटेलचे बाजूला असलेल्या शौचालयाकडे गेल्या असता दोन इसम काळया रंगाची विनानंबर युनीकॉन गाडीवरून आले व प्रतिभा हिच्या गळयातील 4 तोळयाचे सोन्याचे गंठण (Chain Snatching) बळजबरीने ओढून नेले आहे. आमचे कडील गाडीचा चालक नामे संदीप इंद्रभान शेलार हा त्याचे मागे एका दुचाकीवर (Bike) बसून काही अंतरावर त्याचा पाठलाग केला असता ते औरंगाबादचे दिशेने त्याचे गाडीवरून पळून गेले प्रतिभा हीचे गळयातील चार तोळ्याच्या गंठणातील अंदाजे तीन तोळ्याचा भाग तोडून पळून जाण्यात चोरटे यशस्वी ठरले तर एक तोळयाचे गंठण हे प्रतिभा हीने हाताने घटट पकडल्याने तीचेच हातात होत.

File Photo
'त्या' वैद्यकीय अधिकार्‍यांसह तिघांवर गुन्हा दाखल होणार!

अशाप्रकारे 1 लाख 50 रूपये किमतीचे अंदाजे तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण दोन अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून चोरून नेले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.

File Photo
श्रीरामपूरच्या मुख्याध्यापकासह कोर्‍हाळ्याच्या दोघांवर गुन्हा; हे आहे कारण
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com