देवगडफाटा येथे छताचा पत्रा कापून मोबाईल शॉपीत चोरी

देवगडफाटा येथे छताचा पत्रा कापून मोबाईल शॉपीत चोरी

देवगडफाटा |वार्ताहर| Devgad Phata

मोबाईल शॉपीच्या छताचे पत्रे कापून आत प्रवेश करुन 50 हजार रुपये किंमतीच्या वस्तूंची चोरी झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील देवगडफाटा येथे घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथे सलीम शेख यांचे मोबाईल शॉपी हे दुकान आहे. शनिवारी रात्री दुकानाचा वरील पत्रा कापून दुकानातून तब्बल 50 हजार रुपये किमतीचे मोबाईल संच व इतर वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. दुकान मालक सलीम शेख यांचा मुलगा दुकानावर आला असता दुकानाचे वरील पत्रे व सिलिंग वाकवलेल्या व कापलेल्या स्थितीत आढळले.

आत प्रवेश केला असता दुकानातील मोबाईल संच, गल्ल्यातील रोख रक्कम व मोबाईलच्या इतर लहान वस्तू गायब झालेल्या दिसल्या. त्यांनी आपल्या वडिलांना फोन करून याविषयी माहिती दिली. तसेच नेवासा पोलिसांनाही माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी आले. व पाहणी केली. उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अलिकडच्या काही महिन्यात देवगड फाटा येथे किसनगीरी कृषी सेवा केंद्र तसेच गणेश भोरे यांचे कापड दुकानात दोनदा चोरी झाली. तसेंच येथे अनेक दुकाने फोडून लहान-मोठ्या चोर्‍या मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. अनेकांनी गुन्हे दाखल केले नाही व ज्यांनी दाखल केले त्यांचा आजपर्यत सुध्दा तपास लागलेला नाही. देवगड फाटा येथील कापड दुकानदार गणेश भोरे यांचे दोन वेळेस दुकान फुटले. भोरे यांनी आरोपीची ओळख पटवून मित्राच्या मदतीने आरोपी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला होता. गुन्हाही दाखल केला होता. परंतु पोलिसांनी पुढे काहीच तपास केला नाही असे भोरे यांनी सांगितले.

अलीकडे दुकानासमोर लावलेले वीज बल्ब सुध्दा भुरटे चोर चोरुन नेतात. डिझेल चोरी, हावेवरील गाड्यांना अडवणे, अशा अनेक चोरीच्या घटना देवगड फाटा परिसरात घडत आहेय. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व आरोपींना अटक करावी अशी मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com