अनिल राठोड लोकाभिमुख नेतृत्व होते

अनिल राठोड लोकाभिमुख नेतृत्व होते

ना.फडणवीससह चंद्रकांत पाटील यांची राठोड परिवाराची घेतली भेट

हमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्व. अनिल राठोड यांनी नेहमीच लोकांचा विचार केले. जनसमान्यांमध्ये राहून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आयुष्य वेचले. 25 वर्षे आमदार म्हणून त्यांनी मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लावले. विधानसभेत ते नेहमी आपल्याकडे जनतेच्या कामांसाठी पाठपुरवा करत. युतीच्या काळात नगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये समन्वय साधून अनेक संस्थांवर युतीचे वर्चस्व निर्माण केले. त्यांचा हिंदूत्वाचा मुद्द हा नेहमीच भावला. लोकांमध्ये राहून लोकांची काम करणारे स्व.अनिल हे लोकाभिमुख नेतृत्व होते, असे प्रतिपादन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शिवसेना उपनेते स्व. राठोड यांच्या निवासस्थानी विरोधीपक्ष नेते फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन राठोड परिवाराशी चर्चा केली. याप्रसंगी विक्रम राठोड, राम शिंदे, आ. गिरिष महाजन, आ. राधाकृष्ण विखे, खा. सुजय विखे, अभय आगरकर, सुवेंद्र गांधी, भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, सचिन जाधव, परेश लोखंडे, योगीराज गाडे, शशिकांत देशमुख, गौरव ढोणे, शैलेश मुनोत आदी उपस्थित होते. याप्रसंगी विक्रम राठोड यांनी स्व.राठोड यांच्या कार्याची माहिती दिली.

भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील, शिंदे, आ. महाजन आदींनी स्व.राठोड यांच्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर शिवालय येथे सर्व मान्यवरांनी जाऊन स्व. राठोड यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी दत्ता जाधव, मदन आढाव, महेश शेळके, सचिन राऊत, मनोज चव्हाण, मंदार मुळे, सत्यम मुथा, बाबालाल गांधी, संतोष गांधी, सुमित धेंड, महेश राऊत, शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com