करोना संसर्ग लवकरात लवकर कसा नाहीसा होईल यासाठी प्रयत्न गरजेचे - फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते पवनपूत्र कोविड रुग्णालयाचे ऑनलाईन उद्घाटन संपन्न
करोना संसर्ग लवकरात लवकर कसा नाहीसा 
होईल यासाठी प्रयत्न गरजेचे - फडणवीस

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

24 तास राबून केवळ 15 दिवसात हे प्रकाश चित्ते व सहकारी यांच्या प्रयत्नातून हनुमान मंदिर विश्वस्त संचलीत पवनपूत्र कोविड रुग्णालय उभे करणार्‍यांचे कष्ट खरोखरच वाखणण्याजोगे आहे. सध्या 72 बेडची क्षमता असलेले या रुग्णालयात 400 बेडची क्षमता करण्याचा मानस आहे. मात्र जास्त बेडची क्षमता वाढण्याची वेळच येवू नये. तसेच हा करोना संसर्ग लवकरात लवकर कसा नाहीसा होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीरामपूर येथील म्हाडा या ठिकाणी हनुमान मंदिर टस्ट संचलित पवनपूत्र कोविड रुग्णालयाचे उद्घाटन ऑनलाईन पध्दतीने केले. याप्रसंगी खा. सदाशिव लोखंडे, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, म्हाडाचे चेअरमन शिवाजीराव ढवळे, प्रकाश चित्ते, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पवार, पोलीस निरीक्षक संजय सानप, अशोक थोरे, नगरसेवक दिपक चव्हाण, सौ. वैशाली चव्हाण, किरण लुणिया, मुख्याधिकारी गणेश शिंदे, मनसेचे बाबा शिंदे, प्रविण पांडे,श्री हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मनिलाल पोरवाल, खजिनदार सुनिल गुप्ता, विश्वस्त चंपालाल फोपळे, संजय पांडे, बेलापूरचे सरपंच महेन्द्र साळवी, उद्योजक सतिश चोरडीया, रमेश गुंदेचा, राजेंद्र चव्हाण, सौ. पुष्पाताई हरदास, बाळासाहेब हरदास, डॉ. मच्छिंद्र त्रिभुवन, डॉ.रानवडे, डॉ. विजय मकासरे, म्हाडाचे जयवंत घोडके आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले की, सध्या जास्तीत जास्त लसीकरण होणे गरजेचे आहे. लसीकरण तळाग़ाळापर्यंत होईल यासाठी आपणा सर्वांचे सामुहिक सहकार्य लागणार आहे. या सामाजिक कार्यासाठी परिश्रम घेतले याबद्दल सर्वांचे आभार. खा. सदाशिव लोखंडे म्हणाले, या कोविड रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना चांगली सेवा मिळून हे कोविड रुग्णालय कामाच्याबाबतीत जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आदर्श कसे होईल असे काम करावे. यात राजकारण न करता या सेवा देण्याचे काम केले जावे असे आवाहन त्यांनी केेले.

आ. सुधीर तांबे म्हणाले, कोविड रुग्णालय उभे करण्यात सर्व पक्षीयांचा सहभाग आहे. या रुग्णालयातून सर्वसामान्य रुग्णांना चांगले उपचार कसे मिळतील यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत.

म्हाडाचे चेअरमन शिवाजी ढवळे म्हणाले, हनुमान मंदिर ट्रस्ट संचलित पवनपूत्र कोविड रुग्णालय उभे करताना हे सेवाभावी सेवा देवून ना नफा ना तोटा या धर्तीवर सुुरु करण्याचा प्रयत्न खरोखरच स्तृत्य आहे. प्रास्ताविक प्रकाश चित्ते यानी केले. सुत्रसंचलन अभिजित कुलकर्णी, यांनी तर आभार डॉ. दिलीप शिरसाठ यांनी मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com