संजीवनी कोविड सेंटर सुविधायुक्त - फडणवीस

संजीवनी कोविड सेंटर सुविधायुक्त - फडणवीस

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

संजीवनी उद्योग समुहामार्फत सुर करण्यात आलेले संजीवनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर हे आरोग्य सुविधायुक्त सेंटर असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

संजीवनी युवा प्रतिष्ठान यांनी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात संजीवनी डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटर राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन ऑक्सीजनयुक्त बेडची पाहणी केली, याप्रसंगी ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, संजीवनी समुहाने रुग्णांसाठी मोठी जबाबदारी घेतली आहे. आरोग्य विभाग त्यांची जबाबदारी उत्तम पध्दतीने पार पाडीत आहे. स्वच्छता विभागाचे कर्मचारी देखील जीव धोक्यात टाकून काम करतात. संजीवनीची टीम आरोग्य व भोजन व्यवस्था ही करत आहे. राज्यभर भाजप कार्यकर्ता सक्रिय आहे, याचाच एक भाग म्हणजे हे कोविड सेंटर असल्याचे फडणवीस म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com