अकोले |प्रतिनिधी| Akole

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज वरळी येथे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.

यावेळी सुमारे तासभर माजी मुख्यमंत्री फडणवीस व माजी मंत्री पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्यात चर्चा झाली. पिचड यांच्या प्रकृतीची चौकशी साठी आलेले फडणवीस यांच्या या भेटी मुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मधुकरराव पिचड यांना अलीकडे प्रकृतीच्या कारणास्तव लीलावती रुग्णालयात दाखल केले होते. नुकताच त्यांना डिसचसर्ज देण्यात आला असून ते परळी येथील निवास स्थानी आराम करत आहे. त्यांची तब्येत ठणठणीत आहे.

आज सकाळी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वरळी गाठले .यावेळी पिचड यांच्या प्रकृतीची चौकशी केली . विविध विषयवार चर्चा करण्यात आली .माजी आमदार वैभवराव पिचड हेही उपस्थित होते.

दरम्यान अहमदनगर येथे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर व जिल्ह्याच्या प्रमुख नेत्यांची काल सोमवारी बैठक झाली. यावेळी ही आमदार वैभवराव पिचड उपस्थित होते. त्यानंतर आज वरळी येथील फडनवीस यांच्या भेटीचे राजकीय कंगोरे काढले जात आहे.