देवदैठण येथे डोक्यात गोळी घालून खून

मृत पिंपळनेर येथील : सख्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल, तिघांना अटक
देवदैठण येथे डोक्यात गोळी घालून खून

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील देवदैठण येथे जमिनीच्या वादातून एकाचा खून झाला. शनिवारी रात्री झालेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी मृताच्या सख्ख्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल केला. त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. पाडूरंग जयवंत पवार (वय 52, रा. पिंपळनेर, ता. पारनेर) असे खून झालेल्या व्येीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडुरंग पवार यांचा शंकर पवार या सख्या भावाशी जमिनीचा वाद होता.

शनिवारी सकाळी पाडूरंग पवार हे दत्तात्रय भाऊसाहेब लटांबळे, शिवदास श्रीधर रासकर, शंकर काशिनाथ जकटे (रा. पिंपळनेर) या मित्रांबरोबर सायंकाळी सूपा येथील हॉटेलवर मद्यपान केले. त्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील पाहुण्यांकडे आले. माघारी जाताना ढवळगाव येथील हॉटेलमध्ये पुन्हा मद्यपान केले. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घरी जाताना देवदैठण येथील एरिगेशन कॉलनीसमोर तिघांनी पवार यांचा डोक्यात गोळी अथवा धारदार शस्त्रानी घाव घालून खून केला. घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे रविवारी सकाळी त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, नाईक संतोष गोमसाळे, डी. आर पठारे, चालक शिंदे यांच्या टीमने तपास केला. त्यानंतर पिंपळनेरहून वरील तीन जणाना ताब्यात घेतले. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात सागर पांडुरंग पवार (वय 25) यांनी फिर्यादी दिली. त्यात शंकर जयवंत पवार (मयताचा भाऊ) देखील सामील असल्याचा आरोप केला असून तो पसार आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे, उपनिरिक्षक प्रकाश बोराडे, आर. टी. शिंदे, हसन शेख, मधूकर सुरवसे, संतोष गोमसाळे, डी. आर. पठारे, सतिश शिंदे, शिपलकर यांनी केला. अधिक तपास निरीक्षक संपतराव शिंदे करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com