
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
49 वर्षीय महिलेचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दिनांक 19 ऑगस्ट रोजी घडली आहे. या घटनेतील 49 वर्षीय महिला ही तिच्या घराच्या पाठीमागे रोडच्या कडेला झाडाचा पाला काढत होती. त्यावेळी आरोपी भाऊसाहेब हरिश्चंद्रे याने त्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
त्या महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी भाऊसाहेब एकनाथ हरिश्चंद्रे, राहणार देवळाली प्रवरा, ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. 796/2022 भादंवि कलम 354 प्रमाणे विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार संतोष राठोड करीत आहेत.