देवळालीत कुत्रा व बिबट्यांचा थरार

दोन बिबट्यांपुढे त्याची झुंज अपयशी ठरली
देवळालीत कुत्रा व बिबट्यांचा थरार

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Devalali Pravara

रात्रीच्या अंधारात त्याला कसलातरी सुगावा लागला म्हणून तो घराचे अंगण सोडून पुढे गेला तर त्याला तिथं ते दोघे दिसले. ते दोघे आणि हा एकटा तरी देखील त्याने मालकाच्या खाल्लेल्या मिठाला जागत ईमाने इतबारे त्या दोघांशी निकराची झुंज दिली. परंतू, शेवटी त्याची ताकद कमी पडली. व त्या दोघांनी त्याला ठार केले.एखाद्या चित्रपटालाही लाजविल अशी ही घटना परवा येथिल विश्वास कडू पाटील यांच्या वस्तीवर घडली. घडलेला प्रकार पाटील व त्यांच्या मुलाने समक्ष पाहील्याने अजून देखील ते या धक्क्यातून सावरलेले नाहीत.

देवळालीत कुत्रा व बिबट्यांचा थरार
मुल्ला कटरचे दोन साथीदार मालेगावातून जेरबंद

देवळाली प्रवरा - दवणगाव रस्त्यावर विश्वास पाटील यांची वस्ती आहे. त्यांनी तिन वर्षा पुर्वी बंगलोर येथून दोन,तिन महीने वयाचे जर्मन शेफर्ड जातीचे डबल बून, डबल कोट असलेले कुत्र्याचे पिल्लू आणले होते. कंबरे इतका उंच शरीराने धडधाकट असलेला या कुत्रा बघताच क्षणी समोरच्याची भितीने गाळण उडत होती. रोज पाच ते सहा अंडी,दोन लिटर दूध व पाच ते सहा पोळ्या असा त्याचा रोजचा आहार होता. त्यामुळे त्याची प्रकृती एकदम धष्टपुष्ठ होती. पाटील कुटुंब त्याला प्रमाणे टोनी या नावाने हाका मारत असत.तो त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य झाला होता. त्याच्यासाठी खास पिंजरा तयार करण्यात आला होता. त्या मध्ये त्याला रोज ठेवण्यात येत होते.व रात्री दहा नंतर सोडून देण्यात येत होते व पहाटे पाच वाजता पुन्हा पिंजर्‍यात जेरबंद करण्यात येत असे. रानची वस्ती असली तरी तो इमाने इतबारे राखणाचे काम करत होता. त्याला रात्री साप, बिबट्या,चोर वगैरे काही दिसल्यास तो मालकाला भुंकूंन,भुंकून जागे केल्या शिवाय राहत नसे.

देवळालीत कुत्रा व बिबट्यांचा थरार
गडाखांकडून किती खोके घेतले? मंत्री संदिपान भुमरें

त्यादिवशी रात्री साधारपणे एक वाजणेच्या टोनी घरा जवळ घेऊन जोरजोरात भुंकू लागला. त्याचे भुंकणे ऐकून विश्वास पाटील व त्यांचा मुलगा शिवराज उठवले व हातात टॉर्च घेऊन घरा बाहेर आले असता त्यांना टॉर्च च्या प्रकाशात बिबट्या दिसला. मालकाची साथ मिळाल्या टोनी त्याच्यावर धाऊन गेला परंतू त्याने तेथून पळ काढला.त्यानंतर पून्हा साधारणपणे रात्री दोन, सव्वादोन वाजणेच्या सुमारास टोनीचा किंचाळण्याचा आवाज येऊ लागल्याने पाटील पिता,पुत्र बाहेर आले असता दोन बिट्यांशी टोनीची निकराची झुंज सुरु असलेले विजेच्या प्रकाशात घरा पासून शंभर फुटावरील हे भयानक द्रुष्य समक्ष पाहीले.अंगात धडकी भरवणारे द्रुष्य पासून त्यांना घडीभर काहीच समजेना.

देवळालीत कुत्रा व बिबट्यांचा थरार
गोदाकाठच्या गावावर विमानाच्या घिरट्या

दोघा बिबट्यांनी टोनीला मानेला,पोटाला व शरीरावर इतर ठिकाणी फाडल्याने तो जागेवर गत प्राण झाला. दोघासमोर त्याची ताकद कमी पडली होती.तरी देखील त्याने खाल्लेल्या मिठाला जागून आपल्या प्राणाची आहूती दिली. अंगावर पट्टे असणारे कंबरे इतके उंच्च ते दोघे ही शरीराने धडधाकट बिबटे होते. या नंतर ते पळून गेले.पाटील यांनी फटाके वाजून रात्र जागून काढली. टोनीच्या आठवणीने डोळ्याला डोळा लागत नव्हता. सकाळी त्याच्यावर साश्रू नयनानी विधीवत अत्यसंस्कार करण्यात आले. त्या दिवशी पाटील कुटुंबातील एकही सदस्य जेवला नाही. घरातील सदस्य गेल्या प्रमाणे त्यांनी दुखवटा पाळला.

याबाबत सकाळी वनविभागाला कळविण्यात आले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.ही घटना घडून तिन दिवस झाले तरी वनविभागाचे कोणीही इकडे भिरकले देखील नाही. ही घटना प्राण्याबाबत घडली. ती उद्या मनुष्याबाबत ही घडू शकते? या भागात गेल्या अनेक दिवसांपासून दोन बिबट्यांचा वावर आहे.अनेकांना त्यांनी दर्शन ही दिलेले आहे. याबाबत वनविभागाने गांभीर्याने दखल घेऊन याठिकाणी तातडीने पिंजरा लाऊन बिबटे जेरबंद करावेत अन्यथा कुठल्याही क्षणी रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या भागातील शेतकरी व नागरिकांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com