देशपांडे रूग्णालयातील रक्तपेढी अखेर सुरू

देशपांडे रूग्णालयातील रक्तपेढी अखेर सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रूग्णालयातील रक्तपेढी गेल्या सात महिन्यापासून बंद होती.

मंगळवारी गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर रक्तपेढी पुन्हा सुरु करण्यात आली. यावेळी आ. संग्राम जगताप, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, उपायुक्त यशवंत डांगे, डॉ. शंकर शेडाळे आदी उपस्थित होते.

यावेळी आ. जगताप म्हणाले, ही रक्तपेढी पूर्णक्षमतेने सुरू राहण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. रक्ताचा तुटवडा भासत असताना कै. बाळासाहेब देशपांडे रक्तपेढीने हा तुटवडा भरुन काढावा. रक्तपेढी सुरु करण्यासाठी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला असल्याचे आ. जगताप म्हणाले. सभापती घुले म्हणाले की, आ. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही रक्तपेढी सुरु करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु केले व आज गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर रक्तपेढी सुरु करण्यात आली.

करोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये तर संपूर्ण राज्यभर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यापुढील काळात आपली रक्तपेढी रक्तदान शिबीराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध करुन घेईल व सर्वसामान्य रुग्णांना नियमित रक्तपुरवठा करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com