बदलत्या हवामानात चंदनशेती उपयुक्त- डेरे

बदलत्या हवामानात चंदनशेती उपयुक्त- डेरे

अकोले |प्रतिनिधी| Akole

सध्या शेतकरी लहरी हवामानाचा सामना करत आहे. अशा नाजुक परीस्थितीत उशिरा परंतु हमखास उत्पन्न देणारी चंदनशेती फायदेशीर ठरणार आहे,

असे प्रतीपादन चंदनतज्ञ रमाकांत डेरे यांनी केले.

तालुक्यातील धामनवन आवारी येथे चंदनशेती लागवड कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, गट शिक्षण अधिकारी जालिंदर खताळ, कृषी सहाय्यक अधिकारी राजाराम साबळे, सरपंच पूनम आवारी, उप सरपंच गणेश पापळ व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी रमाकांत डेरे म्हणाले, एके काळी भारत देश चंदनाची राजधानी होता. त्याची मोठ्या प्रमाणावर लूट झाली. सध्या आपल्याला चंदन आयात करावे लागते. आता मात्र महाराष्ट्रात चंदनाची व्यापारी लागवड होऊ लागली आहे. चंदनापासून साबण, सौंदर्य प्रसाधने, अत्तर, पावडर, तेल, क्रीम व औषधे तयार केली जातात. त्यामुळे त्याची मागणी वाढतच जाणार आहे.

यावेळी कृषी अधिकारी प्रवीण गोसावी म्हणाले, या गावातील पाच शेतकरी यांनी 3.5 एकर क्षेत्रावर चंदन लागवड करून पर्यायी परिश्रम घेतले आहे. नक्कीच याचा इतर शेतकर्‍यांना फायदा होईल. शासनाच्या औषधी व सुगंधी वनस्पती प्राधीकरण मार्फत चंदन शेतीला लागवडीसाठी सहाय्य केले जाते.

आत्मा मार्फत आपण गट स्थापन करून चंदन व्यावसायीक शेतीकडे नक्कीच वाटचाल करू शकतो. तसेच शेतकर्‍यांनी सोयाबीन बियाणे या बी संवर्धन करून ठेवा, कारण बियाणे टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे घरचे बियाणे वापरले तर आपला खर्च वाचणार आहे. चारोळी सारखे पीक देखील शाश्वत उत्पादन देणारे आहे. सध्या आपण आदिवासी भागात शमरी व फणस व चारोळी लागवडीसाठी जनजागृती करत आहे.

आत्माचे बाळासाहेब सोनवणे यांनी गटशेती व प्रक्रिया संधी बद्दल माहिती दिली तर चंदन आठ वर्षानंतर गंध वृद्धी होण्यास सुरवात होते. गटामार्फत आपल्याला मूल्यवृद्धी व विक्री व्यवस्था करता येणार आहे.

प्रास्तविक चंदन लागवड केलेल्या शिवाजी आवारी यांनी केले, तर आभार गणेश पापळ यांनी मानले. यावेळी राधकीसन पोखरकर, शिवाजी आवारी, बाळासाहेब शिवाजी आवारी, बाळासाहेब आवारी, राहुल जाधव यांनी चंदन शेतीचे अनुभव कथन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक एस. जे. वाडे, कृषी सहाय्यक एस.के.भोये, एन.बी. रामोळे, एल.जे.घागरे, बी.एन.दातीर,ए.बी.वर्पे, ए.ए.गोंदके, टी.एम. कर्पे व शेतकरी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com