बाबांच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची गावकरी गेटमधून दर्शन व्यवस्था करावी

उपनगराध्यक्ष पठारे यांनी संस्थानचे अध्यक्ष आ.काळे यांना दिले निवेदन
बाबांच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची गावकरी गेटमधून दर्शन व्यवस्था करावी

राहाता |वार्ताहर| Rahata

राहाता सह परिसरातील शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्तांसाठी गावकरी गेटमधून दर्शन व्यवस्था करावी, अशी मागणी राहाता नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी संस्थानचे नूतन अध्यक्ष आ. आशितोष काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पठारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राहाता शहरातील व परिसरातील बाबांच्या दर्शनासाठी अनेक साईभक्त गुरुवारी तसेच इतर दिवशी नित्यनियमाने जातात. त्यांना गावकरी गेट ऐवजी इतर दुसर्‍या गेटने दर्शनासाठी सोडले जाते. त्यामुळे तासन्तास वाट पाहूनही दर्शन मिळत नाही. परिणामी अनेकांचा हिरमोड होतो. शिर्डी याठिकाणी राहाता व परिसरातील अनेक साईभक्त प्रत्येक गुरुवारी बाबांच्या पालखीसाठी शिर्डीत हजेरी लावतात. सर्व धर्म समभावाचे प्रतीक समजले जाणारे साईबाबांचे दर्शन व्हावे यासाठी साईभक्त व्याकूळ असतात. त्यांना गावकरी गेटने दर्शन घेता यावे यासाठी आपण प्रयत्न करावेत,अशी मागणी पठारे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com