अकोलेच्या उपनगराध्यक्षपदी नवले

अकोलेच्या उपनगराध्यक्षपदी नवले

अकोले |प्रतिनिधी|Akole

अकोले नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे कार्यकर्ते व माजी आ. वैभव पिचड यांचे कट्टर समर्थक शरदराव नवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बाळासाहेब वडजे यांची निवड झाल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया बुधवारी पार पडली. उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे शरद नवले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

उपनगराध्यक्ष पदासाठी सूचक म्हणून नगरसेवक सागर चौधरी तर अनुमोदक म्हणून नगरसेविका तमन्ना शेख यांनी स्वाक्षर्‍या केल्या. नगरपंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत पिठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी शरद नवले यांचा एकमेव अर्ज आल्याने शरद नवले यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी डॉ. विक्रम जगदाळे यांनी काम पाहिले.

याप्रसंगी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक सागर चौधरी, हितेश कुंभार, विजयराव पवार, सोनाली नाईकवाडी, शितल वैद्य, प्रतिभा मनकर, वैष्णवी धुमाळ, तमन्ना शेख, माधुरी शेणकर, कविता शेळके, जनाबाई मोहिते, राष्ट्रवादीचे आरिफ शेख, सेनेचे नवनाथ शेटे, काँग्रेसचे प्रदीपराज नाईकवाडी उपस्थित होते.

ही निवड प्रक्रिया होण्याअगोदर सकाळी भाजपा कार्यालयात माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकित सर्वांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आ. वैभव पिचड यांना निर्णय घेण्याचा सर्वानुमते अधिकार दिला व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी सर्व नगरसेवकांची मते जाणून घेऊन भविष्यातील वाटचालीच्यादृष्टीने उपनगराध्यक्षपदासाठी नगरसेवक शरद नवले यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी माजी आ. वैभव पिचड, शिवाजीराजे धुमाळ, गिरजाजी जाधव, सुरेश खांडगे, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, सरचिटणीस यशवंतराव आभाळे, भाऊसाहेब वाकचौरे, अकोले तालुका एज्युकेशनचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, दूध संघाचे संचालक आनंदराव वाकचौरे, आप्पासाहेब आवारी, जगन देशमुख, मधुकरराव बिबवे, संदीप शेटे, सुनील कोटकर, अरुण शेळके, शाम वाळुंज, सचिन शेटे, अमोल वैद्य, कैलास नवले, बबलु धुमाळ, मोसिन शेख, परशराम शेळके, रविंद्र शेणकर, नवनाथ मोहिते, शंभू नेहे, राकेश देशमुख, अनिल डोळस, उदय काकड, सचिन जोशी, अशोक आवारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी नूतन उपनगराध्यक्ष शरद नवले यांचा सत्कार करण्यात आला. यापुढे विकास कामे मार्गी लावण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करू, अशी ग्वाही माजी आ. वैभव पिचड यांनी दिली. तर उपनगराध्यक्ष शरद नवले यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आ. वैभव पिचड, पक्षाचे पदाधिकारी तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी बिनविरोध निवड केली. त्याबद्दल आभार व्यक्त करत दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी कटिबद्ध राहू, असे आश्वासित केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com