मंजूर कामांना दिरंगाई, प्रशासन जबाबदार - उपमहापौर भोसले

रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना
मंजूर कामांना दिरंगाई, प्रशासन जबाबदार - उपमहापौर भोसले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील रस्त्यांच्या कामाला निधी मिळवून देखील प्रशासनाच्या दिरंगाईमुळे व एकमेकांच्या विभागावर ढकलण्याच्या सवयीमुळे कामे सुरू होत नाही. दोन ते तीन महिन्यांपूर्वी ठेकेदाराची नियुक्ती होऊन देखील सोलापूर रोड ते विठ्ठल- रखुमाई पर्यंतचा व सारसनगर मधील संदीपनगरचा रस्त्याचे काम सुरू झाले नाही. उद्यापासून या दोन्ही रस्त्यांची कामे सुरू करा, असा आदेश उपमहापौर गणेश भोसले यांनी प्रशासनाच्या बैठकीत दिला.

उपमहापौर भोसले यांनी आयुक्त कार्यालयात रस्ता कामासंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, स्थायीचे माजी सभापती अविनाश घुले, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त श्रीनिवास कुर्‍हे, नगरसेवक प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त गोरे यांनी सर्व विभागाच्या अधिकार्‍यांना खडेबोल सुनावत सांगितले की, आपापल्या जबाबदार्‍या सक्षमपणे पार पाडा.

या दोन्ही रस्त्यांचे उद्यापासून काम सुरू करा, मी स्वतःयेऊन या रस्त्यावरील अतिक्रमण व लाईट पोलच्या अडचणी दूर करील. लाईन आऊट करून फक्की मारून घ्यावी व कामाला सुरूवात करावी, असे आदेश यावेळी त्यांनी दिले.

दरम्यान नागरिकांची छोटी-मोठी कामे सुद्धा खालील कर्मचारी व अधिकारी वेळेवर सोडवत नसल्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी आयुक्तांकडे यावे लागते. नाहीतर नागरिकांसहित आयुक्तांच्या दालनात आंदोलन करावे लागते. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. छोटी मोठी कामे ही खालीच मार्गी लागावी, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.