पोलीस उपमहानिरीक्षक सात दिवस जिल्हा दौर्‍यावर

डॉ. शेखर पाटील करणार वार्षिक तपासणी
पोलीस उपमहानिरीक्षक सात दिवस जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वार्षिक निरीक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांकडून जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालय, पोलीस ठाण्याच्या कामकाजाची तपासणी होणार आहे. त्यासाठी विशेष पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील हे सात दिवस अहमदनगर जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.

10 जानेवारीपासून कोपरगाव पोलीस ठाण्यापासून त्यांच्या दौर्‍यास सुरूवात होणार आहे. त्याच दिवशी श्रीरामपूर उपविभागीय कार्यालयाचे निरीक्षण होणार आहे. 11 जानेवारीला नेवासा पोलीस ठाणे, शेवगाव उपविभागातील कार्यालयासह कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षण, 12 जानेवारीला नगर शहर उपविभागातील कार्यालय, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षण व कर्जत उपविभागातील पोलीस अधिकार्‍यांच्या मुलाखती, 13 जानेवारीला पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षण व अहमदनगर ग्रामीण उपविभाग कार्यालयाचे निरीक्षण, 14 जानेवारीला परेड, पोलीस मुख्यालय भेट व अहमदनर ग्रामीण उपविभागातील पोलीस अधिकार्‍यांच्या मुलाखती, 15 जानेवारीला कार्यालयीन शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्ह विशेष शाखा, वाचक शाखा व इतर शाखांचे निरीक्षण व सदर विभागातील अधिकार्‍यांच्या मुलाखती, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांची गुन्हे परिषद, 17 जानेवारीला संगमनेर उपविभाग कार्यालयाचे निरीक्षण व संगमनेर उपविभागातील पोलीस अधिकार्यांच्या मुलाखती होणार आहेत.

तसेच, 4 जानेवारीपासुन नाशिक परिक्षेत्राच्या उपमहानिरीक्षक कार्यालयाचे एक पथक तपासणीसाठी दाखल होणार आहे. याबाबत नगर पोलीस दलाला सूचना देण्यात आल्या असून, पोलीस अधिकार्‍यांची धावपळ सुरू झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com