जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करा

नाशिकचे उपमहानिरीक्षक शेखर यांचे जिल्हा पोलिसांना आदेश
जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना अनलॉकनंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा (Illegal Trades) सुळसुळाट झाला आहे. पुढील 10 दिवसांमध्ये गणेशोत्सव सुरू होत आहे. या काळात अवैध धंदे (Illegal Trades) रोखण्याचे आव्हान जिल्हा पोलीस दलासमोर (District Police Force) आहे. अवैध धंद्यांवर कारवाई (Action on illegal trades) करण्याच्या सूचना (Order) नाशिक परिक्षेत्राचे नव्याने हजर झालेले पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर (Deputy Inspector General of Police Dr. B. G. Shekhar) यांनी जिल्हा पोलिसांना (Police) दिल्या आहेत. यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांना अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवावी लागणार आहे.

जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमागे (Crime) खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे हे एक कारण आहे. अवैध दारू विक्री (Illegal sale of alcohol), जुगार (Gambling), गावठी कट्टे (Gavthi katta), तलवारी, गुटखा विक्रेत्यांचा (Gutkha Sales) सुळसुळाट झाला आहे. मध्यंतरी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पोलिसांनी जिल्ह्यातील गावठी हातभट्टी दारू, गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. तरीही अवैध धंदे सर्रास सुरू आहेत. करोना लॉकडाऊन (Covid Lockdown) नंतर अनेकांनी अवैध धंदे (Illegal Trades) जोमाने सुरू केले आहेत. याकडे स्थानिक पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष (Ignore) होत आहे. त्यांच्याकडून अवैध धंद्यांवर कारवाई (Illegal Trades Action) केली जात नाही. एक तर एलसीबी (LCB) नाहीतर एसपीच्या (SP) विशेष पथकाकडून या धंद्यांवर कारवाई (Action) केली जाते.

10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. यंदाही गणेशोत्सवावर करोनाचे सावट असले तरीही या कालावधीत दारू, जुगार, गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यामुळे नव्याने हजर झालेले उपमहानिरीक्षक शेखर (Deputy Inspector General of Police Dr. B. G. Shekhar) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गणेशोत्सव पूर्वी व गणेशोत्सव काळात अवैध धंद्यांविरोधी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. 28 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर या कालावधीत ही मोहीम राबवून केलेल्या कारवाई बाबतचा दैनिक अहवाल कार्यालयास सादर करण्याच्या सूचना उपमहानिरीक्षक शेखर यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यात खुलेआम सुरू असलेली अवैध दारू विक्री, जुगार, गुटखा विक्रीबरोबर गावठी कट्टे, तलवारीसह अन्य हत्यारे बाळगणे, एनडीपीएस कारवाई, समन्स-वॉरंट बजावणी, प्रतिबंधक कारवाई या शिर्षाखाली जास्तीत जास्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केलेल्या कारवाईचा दैनिक अहवाल नाशिक परिक्षेत्र कार्यालयास सादर करण्याचे आदेश उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com