स्वच्छ सुंदर शहर करण्यासाठी कचर्‍याचे नियोजन करा

उपायुक्त यशवंत डांगे यांच्या सूचना
स्वच्छ सुंदर शहर करण्यासाठी कचर्‍याचे नियोजन करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील घरोघरी घंटागाड्या गेल्या पाहिजे, ओला व सुका कचरा विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, तेव्हाच खर्‍या अर्थाने आपले शहर स्वच्छ व सुंदर राहिली.

यासाठी सर्व घनकचरा व आरोग्य विभागाने कामाचे नियोजन करावे, अशा सुचना उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिल्या

शहरातील कचरा संकल संदर्भात उपायुक्त डांगे यांनी मनपात बैठक घेतली यावेळी त्यांनी संबंधीत अधिकारी व कर्मचार्‍यांना सुचना दिल्या. उपायुक्त डांगे म्हणाले, शहरातील एक लाख वीस हजार घरापर्यत घंटागाडी जावून 100 टक्के कचर्‍याचे संकलन होणे गरजेचे आहे.

शहरातील 3 रॅम्पवरून घंटागाडीतील कचरा डेपोवर वेळेचे नियोजन करून पाठविण्यात यावा. आपण ठेकेदारामार्फत उचलेल्या कचर्‍यासाठी कोट्यावधी रूपये देतो. त्याच्याकडून काम करून घेणे गरजेचे आहे. यासाठी नियोजन करा. कुठेही रस्त्यावर कचर्‍याचे ढिग दिसणार नाही, याची काळजी घ्या.

ओला व सुका कचरा वेगळा करणे गरजेचे आहे. यासाठी ठेकेदार यांनी घंडागाडीला दोन कप्पे करण्यात यावे व नागरिकांना याची माहिती द्यावी अशा सुचना उपायुक्त डांगे यांनी संबंधितांना दिल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com