उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून आ. निलेश लंके यांचे कौतुक

उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून आ. निलेश लंके यांचे कौतुक

पारनेर |प्रतिनिधी|Parner

सकाळी आठ वाजताच आ. निलेश लंके यांचा फोन वाजला व समोरून आवाज आला मी अजित पवार बोलतोय ! तालुक्यातील भाळवणी येथील शरद पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचे कौतुक करून उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आ. लंके यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची सक्त सूचना दिली.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आ. लंके यांच्याशी संपर्क करून राज्यभर गाजताय तुम्ही असेे सांगत आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला पाटील यांनी दिला. भाळवणीचे कोविड सेेंटर यशस्वीपणे सुरू आहे. भविष्यातही सुरू राहील, अशा शुभेच्छा दिल्या. तर फेसबुक, ट्विटरवरून खा. सुप्रिया सुळे या या कोविड सेंटरचे छायाचित्रे प्रसारीत करून आ. लंके यांचे कौतुक केले आहे.

आ. लंके यांच्या कामाचा त्यांच्याकडून नियमित आढावा घेतला जात असून त्यांच्या कामाला खा. सुळे पाठबळ देत आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच आ. लंके यांना संपर्क करून त्यांचे कौतुक केले होते. पवारांनीही आमदार लंके यांना काळजी घेण्याचा सल्ला देतानाच काही मदत लागल्यास कळवावे, असे सूचित केले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com