उपमुख्यमंत्र्यांच्या सभेत चोर्‍या करणारे कर्जत पोलिसांकडून जेरबंद

उपमुख्यमंत्र्यांच्या सभेत चोर्‍या करणारे कर्जत पोलिसांकडून जेरबंद

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

13 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत झालेल्या बाजारतळ येथील सभेत चोरी (Meeting theft) करणारे कर्जत पोलिसांनी जेरबंद (Karjat Police Arrested) केले आहेत. यामध्ये दोन आरोपींचा समावेश आहे.

ज्ञानेश्वर प्रभाकर सायकर, रा. सायकर वस्ती, राशीन येथून सभेसाठी आले होते. दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास सायकर हे श्री संत गोदड महाराजांचे दर्शन (Shri Sant Godad Maharaj)घेण्यासाठी मंत्र्यांसोबत गेले. गर्दीचा (Crowd) फायदा घेऊन त्यांच्या पाठीमागे असलेल्या अनोळखी इसमाने त्यांचे पँटची पाठीमागील खिशातील हात घालून पाकीट (Wallet) काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना ते जाणवल्याने त्यांनी अनोळखी इसमाचा हात पकडला. त्यावेळी त्या इसमाचे हातात सायकर यांना त्यांचे पाकीट (Wallet) दिसले. त्यावेळी त्याने सायकर यांना जोराचा धक्का देऊन हातातील पाकीट हिसकावून साथीदारांसह पळून जाण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान त्यांनी आरडाओरड केल्याने जवळच बंदोबस्त करता हजर असलेले पोलिसांनी (Police) त्याचा पाठलाग करून पकडले. त्यांची नावे अमोल पंढरीनाथ विटेकर वय 25 वर्षे, रा. माऊली नगर, पेठ बीड, ता. जि. बीड, नदीम अख्तर फय्याज अहमद, वय 30 वर्ष, रा. आजाद नगर, मालेगाव जि. नाशिक अशी आहेत. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी विविध पोलिस स्टेशनला चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत. कर्जत पोलीस स्टेशनला जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्या दिवशी आणखी 2 लोकांचे मोबाईल चोरी गेले होते. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर आरोपी कडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अंधारे हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com