ठेवीदाराची ठेव परत केली नाही

परळी पिपल्सच्या संचालकांवर गुन्हा
ठेवीदाराची ठेव परत केली नाही

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

परळी पिपल्स अर्बन मल्टीस्टेटमध्ये ठेवलेल्या ठेवींची रक्कम मुदत संपल्यावर परत केली नाही. त्यामुळे ठेवीदाराने दाखल केलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक व व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कडू भाऊराव काळे रा. नेवासा खुर्द यांनी फिर्यादी दिली असून त्यात म्हटले की, त्यांनी 2013 ते 2020 या काळासाठी पतसंस्थेत ठेवी ठेवल्या. त्यांची रक्कम 14 लाख 57 हजार रुपये परत केली नाही. संबंधित पदाधिकार्‍यांनी रक्कम मिळणार नाही काय करायचे ते करा असे म्हटले. या फिर्यादीवरून नितीन सुभाष घुगे, विशाल एकनाथ सुरडे, योगेश बबन म्हस्के, विश्वजीत राजेसाहेब ठोंबरे, अमित झुंबरलाल गुंजाळ, अर्चना अमित गुंजाळ, अशोक रामभाऊ शेरदुरे, निलेश भाऊसाहेब टेमक, विकास सुभाष भोसले, सुधाकर सदानंद शेलार, आबासाहेब गवारे, निमीषा प्रमोद खेडकर, विजय मधुकर साबळे, भारत लक्ष्मण कोलते यांच्यावर जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने भारतीय दंड विधान कलम 420, 468, 120 ब, 34, ठेवीदार वित्तीय संसाधन हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com