हद्दपार आरोपीचे नगरमध्ये वास्तव्य

पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हद्दपार आरोपीचे नगरमध्ये वास्तव्य

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून अहमदनगर शहरात फिरणार्‍या आरोपीला तोफखाना पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री अटक केली. अभिषेक दिलीप लोणारे (वय 20 रा. निलक्रांती चौक, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात भादंवि कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार सचिन जगताप यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस अंमलदार जगताप, दत्तात्रय जपे, त्रिभुवन यांचे पथक सोमवारी रात्री तोफखाना हद्दीत गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, अहमदनगर जिल्ह्यातून दीड वर्षांकरीता हद्दपार केलेला आरोपी लोणारे हा सारडा कॉलेज परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत आहे.

पथकाने मिळालेल्या माहितीनुसार खात्री केली असता आरोपी लोणारे हा सदर ठिकाणी दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.