पेपरफुटी प्रकरणात शिक्षकाला अटक

संगमनेरचा आरोपी सुखदेव डेरे आणि शिक्षक नागरगोजे एकमेकांचे खास होते
 पेपरफुटी प्रकरणात शिक्षकाला अटक

पुणे | Pune

आरोग्य विभागाच्या गट ‘क’ पेपरफुटी प्रकरणात, पुण्याच्या सायबर विभागाच्या पथकाने बीडमधून एका जिल्हा परिषद शिक्षकाला अटक केली आहे. नागरगोजे नामक हा शिक्षक असून गेल्या 15 दिवसांपासून पुण्याचे पथक बीडमध्ये शिक्षक नागरगोजेचा शोध घेत होते. एकदा तर पथक शाळेवर धडकण्यापूर्वीच तो पथकाला गुंगारा देऊन फरार झाला होता. मात्र काल अखेर पथकाला त्याचा सुगावा लागताच, नागरगोजेला शाळेतून उचलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

आरोग्य विभागाच्या गट क पेपरफुटी प्रकरणात बिडमधून नागरगोजे नामक शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात त्याचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे. आरोग्य विभागाच्या पेपरफुटी,तसेच म्हाडा आणि त्यानंतर टीईटी पेपरफुटी प्रकरणात आत्ता पर्यंत पुणे पोलिसांच्यावतीने 35 जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांचा पेपरफुटी प्रकरणात संबंध असल्याचं निष्पन्न झालं आहे.

या अगोदर पेपटफुटी प्रकरणात बीडच्या शिरूर तालुक्यातील, तितरवणी येथील शिक्षक उद्धव प्रल्हाद नागरगोजे याला अटक करण्यात आलेली होती. याच उद्धव नागरगोजेचा आणि या गळाला लागलेल्या जिल्हा परिषद शिक्षक नागरगोजेचा जवळून संबंध असल्याचं बोललं जातंय. शिवाय वडझरी पॅटर्नच्या संजय सानप याला ज्या मार्गाने गट कची प्रश्नपत्रिका मिळाली त्याच मार्गाने या शिक्षक नागरगोजेला देखील मिळाल्याची चर्चा आहे. बीडमधील नगर रोडवरील एका मंगल कार्यालयात ज्याप्रमाणे संजय सानपचे उमेदवार थांबले होते,

त्याचप्रमाणे या शिक्षक नागरगोजेचे देखील उमेदवार नगर रोडवरील एका मंगल कार्यालयात थांबले असल्याचं सांगितलं जातंय. याशिवाय या जिल्हा परिषद शिक्षक नागरगोजेचा संबंध अनेक भरती प्रकरणाशी असल्याची चर्चा आहे. तर अटकेत असलेला संगमनेरचा आरोपी सुखदेव डेरे आणि शिक्षक नागरगोजे एकमेकांचे खास होते, असेही सांगितले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com