छापील किमतीपेक्षा जास्त पैसे घेतल्यास कारवाई

कृषी विभागाचा खत विक्रेत्यांना इशारा
छापील किमतीपेक्षा जास्त पैसे घेतल्यास कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खतांच्या गोण्यांवर छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने खते विकल्यास विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिला आहे.

केंद्र शासनाच्या एनबीएस (न्युट्रीयंट बेसड सबसिडी) पॉलिसीनुसार युरिया खत (266 रुपये) वगळता इतर रासायनिक खतांचे दर ठरविण्याचे अधिकार त्यात्या रासायनिक खत उत्पादक कंपनीस आहेत. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाली असा दाखला देत एप्रिलनंतर काही रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी संयुक्त खते, डीएपी, एसएसपी, एमओपी या खतांच्या किमतीत वाढ केली आहे.

सद्यःस्थितीत बाजारात जुन्या दराची खते सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे रासायनिक खतांच्या गोणीवर छापलेल्या किमती तपासून आणि त्याप्रमाणेच रक्कम देऊन शेतकरी बांधवांनी खते खरेदी करावीत. छपाई किमंतीपेक्षा जादा किमतीची आकारणी करता येत नाही.

रासायनिक खतांच्या काही ग्रेडच्या किमंती वाढल्या असल्या तरी जुन्या दरांची खते (जुने दर छपाई असलेल्या बॅगा) त्याच दरात शेतकर्‍यांना विकणे खत विक्रेत्यांना बंधनकारक आहे. तसे निर्देश सर्व खत विक्रेत्यांना देण्यात आले आहेत. कुठलाही विक्रेता जुन्या दरातील खत वाढीव किंमत आकारून विकत असल्यास शेतकर्‍यांनी तात्काळ संबंधित तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती यांना रीतसर तक्रार करावी किंवा जिल्हा स्तरावरील सनियंत्रण कक्षास 0241- 2353693 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, अशा आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com