कृषी विभागाने यादी सार्वजनिक करावी- पुणे

कृषी विभागाने यादी सार्वजनिक करावी- पुणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

दोन वर्षापूर्वी खरीप सोयाबीन बियाणे उगवणीबाबत समस्या निर्माण झाल्या होत्या. अनेक तक्रारी, फसवणूक अनुभव विचारात घेता मागील वर्षी घरचेच बियाणे ठेवण्याचे प्रबोधन कृषी विभाग मार्फत करण्यात आले. त्याचे चांगले परिणाम मिळाले.

याहीवर्षी ठराविक, प्रयोगशील शेतकर्‍यांना बियाणे योग्य सोयाबीन ठेवण्यास सांगितले आहे. किती शेतकर्‍यांनी बियाणे योग्य सोयाबीन राखून ठेवले याची यादी बनवली जाते. त्यावरून तालुका व जिल्हास्तरावर कोणत्या वाणाचे किती उपलब्ध होऊ शकते ही आकडेवारी विविध आढावा बैठकीत सांगितली जाते. अनेक प्रयोगशील शेतकरी उत्तम प्रकारे नियोजन करून बियाणे योग्य सोयाबीन उत्पादित करतात. अडचण असली तरी त्याची विक्री न करता राखून ठेवतात. अशा शेतकर्‍यांची बनवलेली यादी किंवा मोबाईल नंबर कृषी विभागने सार्वजनिक करावी असे मत ब्राम्हणगाव येथील प्रयोगशील शेतकरी व कृषी प्रश्नाचे अभ्यासक उत्तम पुणे यांनी व्यक्त केले.

त्यामुळे कोणत्या गावात, कुणाकडे, कोणत्या वाणाचे, किती बियाणे उपलब्ध आहे याची माहिती इतर शेतकर्‍यांना मिळेल. यादी व मोबाईल नंबर मुळे बियाणे विकत घेणारे शेतकरी जवळच्या बियाणे उत्पादक शेतकर्‍यांशी संपर्क करून खात्रीशीर बियाणे घेऊन होणारी फसवणूक टाळू शकतील. त्यातूनच ज्यांनी बियाणे राखून ठेवले त्यांचीही विक्री होणेस मदत होईल.कारण व्यक्तिगत पातळीवर शेतकरी फार मोठ्या प्रमाणात प्रचार, प्रसार व जाहिरात करू शकत नाही. कृषी विभागाने याबाबत विचार करून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उत्तम पुणे यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.