देवठाण सेवा संस्थेची निवडणूक चुरशीची होणार

छाननीनंतर 13 जागांसाठी 60 अर्ज वैध
देवठाण सेवा संस्थेची निवडणूक चुरशीची होणार

वीरगाव |वार्ताहर| Virgav

अकोले तालुक्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संवेदनशील असणार्‍या देवठाण येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.छाननीनंतर दाखल केलेले सर्व 60 उमेदवारी अर्ज वैध ठरले. 13 जागांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज वैध ठरल्याने 31 मे रोजी माघारीचे दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. इतक्या मोठ्या संख्येने उमेदवारांची संस्थेचे प्रतिनिधित्व करण्याची सुप्त इच्छा ही निवडणूक बिनविरोध होऊच देणार नाही.

सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी-8 जागा, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी-1 जागा, महिला प्रतिनिधी-2 जागा, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी-1 जागा, भटक्या जाती आणि इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी-1 जागा अशा मिळून 13 जागांसाठी 60 उमेदवारांपैकी निवडणूक लढविणारे उमेदवार 31 मे रोजी स्पष्ट होतील. मतदानास पात्र 993 मतदार या निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन 12 जून 2022 रोजी मतदानाच्या दिवशी आपले प्रतिनिधी निवडतील. या निवडणूक प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. के. साळवे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शांताराम जोर्वेकर हे कामकाज सांभाळतील.

छाननीनंतर वैध उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे.सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी- प्रवीण रामनाथ घाडगे, राम बन्सी सहाणे, रामहरी रखमा सहाणे, राम बन्सी सहाणे, विश्वनाथ नामदेव काळे, बाळनाथ मारुती माशेरे, शिवाजी वामन सोनवणे, महेश मोहन शेळके, जालिंदर चंद्रभान बोडके, सुभाष विठ्ठल दराडे, मच्छिंद्र एकनाथ सोनवणे, भाऊसाहेब पर्वत शेळके, नवनाथ कोंडाजी शेळके, संतोष दादापाटील काळे, आनंदा मारुती काळे, पंढरीनाथ शिवराम शेळके, बाबासाहेब रामभाऊ सोनवणे, उत्तम किसन सोनवणे, बाळू विश्वनाथ, सहाणे, राधाकिसन रावसाहेब काळे, विलास यादव शेळके, प्रकाश बाळासाहेब सहाणे, पोपट पंढरीनाथ शेळके, श्रीराम भाऊराव बोडके, राजीव मुरलीधर शेळके, सुधीर दत्तात्रय शेळके, रावसाहेब लक्ष्मण शेळके, भास्कर रामराव शेळके, अंकुश विलास काकड, मुरलीधर डोंगरु पथवे, मुरलीधर चिमा पथवे, हरिकिसन भाऊराव शेळके,रमेश भाऊराव बोडके, प्रकाश गणपत शेळके, रावसाहेब रामभाऊ गायकवाड, गोविंद बाजीराव सहाणे, विठ्ठल कारभारी सहाणे, संदीप बाळू बोडके.

महिला प्रतिनिधी उमेदवार - पुष्पा बंडू जोरवर, मथुरा ज्ञानेश्वर काळे, शैला राधाकिसन शेळके, शारदा प्रभाकर गायकवाड, द्रौपदाबाई दगडू शेळके, अलका एकनाथ सहाणे, वैशाली केशव बोडके, जयश्री रामनाथ मोरे. अनुसूचित जाती-जमाती उमेदवार-रमेश गोपाळा मेंगाळ, प्रभाकर हरी गायकवाड, मुरलीधर डोंगरु पथवे, रावसाहेब रामभाऊ गायकवाड, शारदा प्रभाकर गायकवाड. इतर मागासवर्गीय उमेदवार-राम बन्सी सहाणे, मधुकर दादा जोरवर, गणपत मनोहर सहाणे, एकनाथ भिकाजी सहाणे. भटक्या जाती-विशेष मागास प्रवर्ग उमेदवार-बाळू तुकाराम काकड, सुभाष विठ्ठल दराडे, सुनील चंद्रभान काकड, सुभाष बंडू काकड, अंकुश विलास काकड.आवश्यकता भासल्यास 12 जून 2022 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदानानंतर लगेचच मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com