योगाभवन राहुरी फॅक्टरीलाच होणार

खासदार लोखंडे यांची ग्वाही
योगाभवन राहुरी फॅक्टरीलाच होणार

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

हिंदूह्रदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे योगाभवन हे शिवसेना शहराध्यक्ष सुनील कराळे यांनी निश्चित केलेल्या जागेवरच होणार असल्याची ग्वाही खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली.

देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने योगाभवन बांधण्यासाठी 80 लक्ष रुपयांचा निधी खासदार लोखंडे यांनी मंजूर करुन दिला आहे. परंतु जागेच्या निश्चितीवरुन गेली वर्षभर हा निधी पडून आहे. याबाबत शिवसेना शहराध्यक्ष सुनील कराळे यांनी खासदार लोखंडे यांची भेट घेतली असता त्यांनी कराळे यांनी निश्चित केलेल्या जागेवरच योगाभवन होणार असल्याचे सांगितले.

योगाभवन वैष्णवी चौक देवळाली बंगला येथेच व्हावे, या मागणीचे निवेदन खासदार लोखंडे यांना छोटा शिवसैनिक सत्यम कराळे याच्या हस्ते देण्यात आले. यावर खासदार लोखंडे म्हणाले, आता छोटा शिवसैनिक यामध्ये उतरला आहे. यावेळी आंबी येथील कार्यकर्त्यांनी देवळाली प्रवरा येथील स्वतंत्र पोलीस स्टेशन कराळे एकटेच लढत आहेत. त्यांना मदत करुन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली असता खासदार लोखंडे म्हणाले, याबाबत लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन त्यांनी दिले.

Related Stories

No stories found.