देवळाली प्रवरा सोसायटी निवडणूक प्रचाराचा बिगूल वाजला

देवळाली प्रवरा सोसायटी निवडणूक प्रचाराचा बिगूल वाजला

आमच्या वाटेला जाल तर याद राखा - माजी आ. चंद्रशेखर कदम

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

आता विरोधकांकडे कोणतेही मुद्दे न राहिल्याने त्यांनी खालच्या व वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करण्याचे धोरण अवलंबिले आहे. अशाने सत्ता मिळत नाही, त्यासाठी योगदान द्यावे लागते. विरोधकांनी टीका करताना तारतम्य बाळगा, आमच्या वाटेला जाल तर याद राखा, असा इशारा माजी आ. चंद्रशेखर कदम यांनी विरोधकांना इशारा दिला.

देवळाली प्रवरा सोसायटीच्या निवडणुकीचा प्रचार नारळ शुभारंभ व सभा देवळाली प्रवरा विकास मंडळाच्यावतीने पार पडली. यावेळी माजी आ.कदम बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष धोंडीभाऊ मुसमाडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, गोरख मुसमाडे, भीमराज कदम, मुरलीधर कदम, अनंत कदम, डॉ. संदीप मुसमाडे, सोपान मुसमाडे, शिवाजी मुसमाडे, दत्तात्रय नालकर, मुनीर शेख, भाऊसाहेब मुसमाडे, अजिज शेख, सोपान शेटे, अजित चव्हाण, सोपान भांड, नानासाहेब सुखदेव पठारे, दशरथ खांदे, गंगाधर खांदे आदींसह सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. संस्थेचे विभाग बंद केले, संस्था वारंवार तोट्यात घातली, या टिकेला उत्तर देताना कदम म्हणाले, यालाच म्हणतात, चोराच्या उलट्या बोंबा! आजवर संस्था जेव्हा-जेव्हा तुमच्या ताब्यात होती, तेव्हा-तेव्हा तुम्ही संस्था डबघाईस आणण्याचे काम केले व आज गेल्या दोन महिन्यांत 189 सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचे पाप कोणी केले? ज्यांना स्वत:ची कर्जाची परतफेड करता आली नाही व सभासदत्व टिकविता आले नाही, असे लोक विरोधी मंडळाचे नेतृत्व करायला पुढे सरसावले आहेत. असे लोक संस्था जीवित ठेवू शकतील का? असा प्रश्न कदम यांनी केला. विरोधकांनी स्वत:ला तपासावे, आम्ही कुणाच्या एक पैशालाही लाचार नाही, सभासदांचे ऊस कारखान्याला देताना कोणी किती पैसे घेतले? याचा हिशोब व यादी पुराव्यानिशी द्यायला भाग पाडू नका, असा इशारा सत्यजित कदम यांनी दिला.

यावेळी माजी नगरसेवक सचिन ढुस, माजी चेअरमन शहाजी कदम, माजी नगरसेवक शिवाजी मुसमाडे व माजी चेअरमन बाळासाहेब मुसमाडे आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी तर आभार माजी नगरसेवक अमोल कदम यांनी मानले.

सत्तेतून सर्वसामान्यांचा छळ बंद करा - बाळासाहेब चव्हाण

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

कर्जमाफी मिळूनही संस्था तोट्यातून बाहेरच आली नाही. सत्ता आली की, सत्तेची मस्ती तुम्हाला चढते, सत्तेच्या माध्यमातून तुम्ही सामान्य माणसांचा छळ करता. आता हे थांबवा, अन्यथा मतदार तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी विरोधकांना दिला.

देवळाली प्रवरा सोसायटीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या 19 जून रोजी होत आहे. त्यानिमित्ताने लोकसेवा मंडळाचा प्रचार नारळ शुभारंभ येथील काकासाहेब चौकात करण्यात आला. यावेळी चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी संचालक मच्छिंद्र शिंदे होते.

व्यासपीठावर चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांत सदस्य अजित कदम, माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, केदारनाथ चव्हाण, सुनील कराळे, सुरेंद्र थोरात, अशोक खुरुद, आदिनाथ कराळे, शैलेंद्र कदम, बाळासाहेब कदम, राजेंद्र कदम, भगवान गडाख, सोपानराव चव्हाण, सुखदेव मुसमाडे, संभाजी कदम, जगन्नाथ होले, मच्छिंद्र मुसमाडे, वसंत कदम, अमित कदम, अरुण खुरुद, संदीप खुरुद, देवराम कडू, अण्णासाहेब शेटे, गोवर्धन शेटे, आनंदराव वाणी, अन्सार इनामदार, करीम शेख, अण्णासाहेब कराळे, उत्तमराव कडू, दासू पठारे, कारभारी वाळुंज, आबासाहेब वाळुंज, सूर्यभान कदम आदींसह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

गणेश भांड म्हणाले, संस्थेने कांदा व धान्य खरेदी केंद्र सुरू करणे, माती परीक्षण, एकात्मिक शेती आदी उपक्रम राबविणे गरजेचे होते. सभासदांसाठी पीककर्ज मर्यादा वाढविणे, कृषी कर्ज सवलत योजना, सौरऊर्जा योजना आदी राबविणे गरजेचे असताना यापैकी कुठलेच काम झाले नाही.

अजित कदम म्हणाले, नगरपरिषद व सोसायटी दोन्ही सत्ता भाजपाकडे दिल्या. परंतु विकास होण्याऐवजी हुकूमशाही व पोरकटपणाचे राजकारण झाले, अशी टीका त्यांनी केली. प्रास्ताविक नानासाहेब कदम यांनी केले. यावेळी भास्करराव तांबे, मच्छिंद्र शिंदे यांची भाषणे झाली.

सभेस प्रमोद कदम, संदीप भांड, विठ्ठलराव शेटे, बबनदादा कदम, दिनकर संसारे, दगडू सरोदे, आदींसह मंडळाचे सर्व उमेदवार, सभासद उपस्थित होते. आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष केदार चव्हाण यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com