देवळाली प्रवरा सोसायटी निवडणुकीचा प्रचार शिगेला

देवळाली प्रवरा सोसायटी निवडणुकीचा प्रचार शिगेला

विरोधकांच्या टिकांना सांगता सभेत उत्तर देऊ - माजी आ. कदम

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

देवळाली प्रवरा सोसायटीच्या माध्यमातून आम्ही संस्थेचे उत्पन्न वाढवून सभासदांचे हित जोपासण्याचे काम केले आहे. कोणाला काय टीका करायची ती करू द्या. सध्या त्यांच्या टिकेकडे दुर्लक्ष करा. विरोधकांच्या सर्व टिकांना सांगता सभावेळी उत्तर देऊ, असा इशारा माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी विरोधकांना दिला.

देवळाली प्रवरा सोसायटी निवडणूक पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा विकास मंडळाच्या प्रचारार्थ वरखडे वस्ती येथे पार पडलेल्या घोंगडी बैठकीत माजी आ.कदम बोलत होते. अध्यक्षस्थानी जिजाबापू वरखडे होते. यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, धोंडीभाऊ मुसमाडे, केरू पटारे, शिवाजी मुसमाडे, भागवत कदम, मुरलीधर कदम, गोरख मुसमाडे, दत्तात्रय नालकर आदी उपस्थित होते.

माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले, 59 सभासद आणि 194 सभासद उडविण्याचे पाप विरोधकांनी केले आहे. जे संस्थेचे साधे सभासद नाही, तेही आमच्यावर टीका करतात. त्यांच्या बोलबच्चनला सभासद बळी पडणार नाहीत.

माजी नगरसेवक सचिन ढुस यांनी विरोधकांची पात्रता नसल्याने देवळालीकरांनी त्यांना खड्यासारखे बाजूला काढण्याचे काम केले असल्याची टीका केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अनंत कदम, अमोल कदम, भीमराज मुसमाडे, संदीप कदम, मच्छिंद्र वरखडे, अजित वरखडे, साहेबराव तनपुरे, संजय नालकर, जनार्धन सिनारे, कारभारी वाणी, सुनील सिनारे, भीमराज मुसमाडे, संतोष कदम, टी.के.कदम आदींसह उमेदवार, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी मानले.

आम्ही सर्व महिला मोठ्या संख्येने निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झालो असून आम्ही सर्व परिसर पिंजून काढला आहे. आम्हाला प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने विकास मंडळाचा विजय निश्चित असल्याचे प्रितीताई कदम यांनी सांगितले.

विरोधकांचे मानसिक संतूलन बिघडले - माजी नगराध्यक्ष चव्हाण

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

विरोधकांनी आम्हाला उमेदवार मिळू नयेत म्हणून जंगजंग पछाडले. तरी देखील आम्हाला उमेदवार मिळाले व आम्ही तोडीसतोड उमेदवार दिल्याने विरोधकांचे संतूलन बिघडले आहे. या निवडणुकीत सभासद त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केला.

देवळाली प्रवरा सोसायटी निवडणूक निमित्ताने प्रचारफेरी दरम्यान कदम वस्ती येथे कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी भागवत कदम, अण्णासाहेब कदम, श्रीकांत कदम, संभाजी कदम, दत्तात्रय कदम, बाळासाहेब कदम, बबनराव कदम, दादासाहेब कदम, वसंत कदम, बाबासाहेब कदम, काकासाहेब कदम, अजित त्रिंबक कदम, इंद्रनील कदम, प्रमोद कदम, संभाजीराजे कदम, रावसाहेब कदम, बाबासाहेब कदम, मोहन कदम, मंजाबापू कदम, शंकर कदम, सोमनाथ निर्मळ, अशोक निर्मळ, मेजर निर्मळ आदी उपस्थित होते.

चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड म्हणाले, आपली हवा आहे म्हणून कोणी गाफील राहू नका. रात्र वैर्‍याची आहे. सर्वांनी एकसंघ होऊन विजयश्री खेचून आणा व इतिहास घडवा असे ते म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित कदम म्हणाले, सर्वसामान्य सभासदाला सन्मान मिळवून देण्यासाठी ही लढाई आहे. यासाठी सभासद निश्चितपणे आमच्या पाठीशी आहेत.

महिला उमेदवार निर्मला कराळे, सुमन कदम व हिराबाई शेटे यांच्यासह सौ.मंदाकिनी भांड यांनी सांगितले, आमच्यासोबत सर्व महिला निवडणूक प्रचारासाठी घराबाहेर पडल्या आहेत. अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकसेवा मंडळाचा विजय निश्चित आहे. आमच्यासोबत द्रौपदा कराळे, लक्ष्मी कराळे, रेखा कराळे, सुभद्रा कराळे, कुसुम कराळे, पुष्पा कराळे, वर्षादेवी कदम, संगीता कदम, शोभा कदम, शोभा नानासाहेब कदम, योगीता कदम, लता कदम, जया शेटे, वृषाली शेटे, शालिनी शेटे आदी महिला सहभागी झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com