देवळाली प्रवरा सोसायटीत विकास मंडळाने सत्ता राखली

देवळाली प्रवरा सोसायटीत विकास मंडळाने सत्ता राखली

लोकसेवा मंडळाचा पराभव; सर्वच जागांवर विकास मंडळाचा विजय; 90 टक्के मतदान

देवळाली प्रवरा |वार्ताहर|

देवळाली प्रवरा सोसायटीच्या अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रशेखर कदम व माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या मार्गदर्शनाखालील विकास मंडळाने विरोधी लोकसेवा मंडळाचा धुव्वा उडवित 12 उमेदवार विजयी होऊन एकहाती सत्ता पुन्हा अबाधीत ठेवण्यात घवघवीत यश मिळविले आहे. विकास मंडळाची एक जागा बिनविरोध झाली होती. त्यामुळे विकास मंडळाच्या सर्वच्यासर्व 13 जागा निवडून आल्या असून 183 मतांच्या फरकाने विकास मंडळाचा पॅनल निवडून आला आहे. एकूण झालेल्या 2165 मतांपैकी 109 मते बाद झाली आहेत.

दरम्यान, विकास मंडळाच्या समर्थकांनी व विजयी उमेद्वारांनी विजयाचा जल्लोष केला.

सर्वसाधारण मतदारसंघात विजयी झालेले विकास मंडळाचे उमेदवार व मिळालेली मते पुढीलप्रमाणे- संतोष चव्हाण 1233 मते ( विजयी ), सुदाम भांड 1221 मते ( विजयी ), राजेंद्र ढुस 1203 मते ( विजयी), बाबासाहेब शेटे 1181 मते ( विजयी ), उत्तम मुसमाडे 1145 मते ( विजयी), मंजाबापू वरखडे 1143 मते ( विजयी), सूर्यभान गडाख 1129 मते ( विजयी), शहाजी कदम 1120 मते (विजयी).

महिला राखीव मतदारसंघ झालेले मतदान - 2165 पैकी 109 मते बाद, उमेदवारांना मिळालेली मते खालील प्रमाणे- स्वरुपा कदम - 1320 मते ( विजयी), संगीता वाळुंज 1332 मते ( विजयी ), इतर मागासवर्गीय मतदार संघ, झालेले मतदान 2165, बाद मते 23, उमेदवारांना मिळालेली मते- दिलीप मुसमाडे - 1272 मते (विजयी), अनु.जाती जमाती मतदारसंघ झालेले मतदान 2165, बाद मते- 28, उमेदवारांना मिळालेली मते- राजेंद्र पंडीत 1253 मते ( विजयी) हे विकास मंडळाचे सर्व उमेद्वार विजयी झाले आहेत.

विकास मंडळाचा विजय निश्चित झाल्यानंतर माजी आ.चंद्रशेखर कदम, माजी.नगराध्यक्ष सत्यजित कदम, सौ.प्रितीताई कदम, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, सचिन ढुस, आदींनी मतदारांचे आभार मानले.

दरम्यान, निवडणुकीत काल रविवार दि. 19 जून रोजी 2473 सभासदांपैकी 2165 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावल्याने विक्रमी 90 टक्के मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी किरण आव्हाड यांच्या अधिपत्त्याखाली शांताबाई कदम सांस्कृतिक भवनामध्ये शांततेत मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 10 वाजेपर्यंत 22 टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाचा ओघ वाढल्याने सकाळी 11 वाजेपर्यंत 34 टक्के मतदान झाले.

मतदान केंद्राबाहेर माजी आमदार चंद्रशेखर कदम, प्रितीताई कदम, प्रकाश संसारे, सचिन ढुस यांच्यासह विकास मंडळाचे सर्व उमेदवार तसेच गणेश भांड, सुनील कराळे, बाळासाहेब चव्हाण, अजित कदम, शैलेंद्र कदम, आदिनाथ कराळे यांच्यासह लोकसेवा मंडळाचे सर्व उमेदवार प्रवेशद्वारावर दुर्तफा उभे राहून अभिवादन करत होते. कुठलाही अनूचित प्रकार न घडता मतदान शांततेत झाले. मतदानासाठी सहा बुथची व्यवस्था केली होती. निवडणुकीसाठी एका बुथसाठी 9 कर्मचारी या प्रमाणे एकूण 54 कर्मचार्‍यांची व्यवस्था केली होती. पोलीस उपनिरीक्षक एस.के.नार्‍हेडा यांच्यासह पाच पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले.

मतदानानंतर लगेच शांताबाई सांस्कृतिक भवनामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीसाठी 20 टेबल व 54 कर्मचार्‍यांची व्यवस्था करण्यात आली. दुपारी 12 वाजता 51 टक्के मतदान झाल्यानंतर मतदान विक्रमी होणार असल्याचा अंदाज आला. मतदानाची वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यत असल्याने सकाळपासूनच मतदानाचा प्रचंड ओघ सुरु होता. मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com