
देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara
देवळाली प्रवरा सोसायटीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या 19 जून रोजी होत आहे. संचालक मंडळाच्या 13 जागेसाठी मंगळवारी दि. 17 मे रोजी 46 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. काल पर्यंत एकूण 67 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज बुधवार दि. 18 मे उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. आता पर्यंत 200 उमेदवारी अर्जांची संस्थेतून विक्री झाली आहेत.
गुरुवार दि.19 मे रोजी आलेल्या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. व वैध उमेदवारी अर्ज प्रसिद्ध केले जातील. 20 मे ते 3 जून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. सलग 25 वर्ष संस्थेची सत्ता एकाच गटाकडे राहील्या नंतर 2011 साली परिवर्तन झाले. काँग्रेस व राष्ट्रवादी ची सत्ता आली. त्यानंतर 2016 साली पून्हा परिवर्तन झाले व भाजपाच्या ताब्यात सत्ता गेली. आता 2022 ला पुन्हा सत्ता परिवर्तध होणार की, भाजपा सत्तेचा बुरुंज आबाधीत ठेवणार हे लवकरच पाहायला मिळणार आहे.
दरम्यान सत्ताधारी व विरोधक दोन्ही गटांनी निवडणुकीला पुरता जोर लावला आहे. विरोधकांनी सर्वपक्षीय आघाडी करुन भाजपाला एकटे पाडण्याची रणनीती आखली आहे. तर भाजपाचे नेहमी प्रमाणे काम सुरु आहे. 2410 सभासद मतदानास पात्र ठरले आहेत. त्यामुळे सभासद कोणाच्या पारड्यात मत टाकतात हे लवकरच समजणार आहे.