देवळालीतून शिवसैनिक आज शिवतीर्थावर जाणार

देवळालीतून शिवसैनिक आज शिवतीर्थावर जाणार

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

हिंदूह्रदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस मुंबई येथे शिवतीर्थावर मानवंदना देण्यासाठी देवळाली प्रवरा शहरातून आज बुधवार दि. 17 नोहेंबर रोजी शेकडो शिवसैनिक रवाना होणार असल्याची माहिती शिवसेना शहराध्यक्ष सुनील कराळे यांनी दिली.

कराळे यांनी सांगितले, शिवसेना जिल्हाप्रमुख पै.रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली तमाम हिंदुचे व शिवसैनिकांचे ह्रदयस्थान असलेले शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना शिवतीर्थावर त्यांच्या पावन स्मृतीस मानवंदना देण्यासाठी राज्यातील लाखो शिवसैनिक जमा होतात. परंतु करोना महामारीच्या काळात दोन वर्ष यामध्ये खंड पडला होता. आता करोनाची लाट ओसरली आहे. ज्या शिवसैनिकांनी करोना लसीचे दोन ढोस घेतले आहेत, अशांची नावनोंदणी करण्यात आली आहे. शिवतीर्थावर आपल्या दैवताला भेटण्यासाठी शिवसैनिक आतूर झाले आहेत.

गेल्या काही दिवसापासून तयारी सुरु होती. यामध्ये सर्व शाखाप्रमुख, शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, सहभागी होणार आहेत. मुंबई येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करुन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तसेच या ठिकाणी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांचे मार्गदर्शन तमाम शिवसैनिकांना लाभणार असल्याने मुंबईला जाण्यासाठी शिवसैनिकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. त्यांना निरोप देण्यासाठी राहुरी रेल्वे स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहणार असल्याचे कराळे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com