देवळालीसह 32 गावांतील 1 लाख नागरिकांची सुरक्षा सहा पोलिसांच्या खांद्यावर

आ. लहू कानडे यांनी लक्ष घालावे - सुनील कराळे
देवळालीसह 32 गावांतील 1 लाख नागरिकांची सुरक्षा सहा पोलिसांच्या खांद्यावर

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

देवळाली प्रवरा (Deolali Pravara) व लगतच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील (Shrirampur Assembly constituency) टाकळीमिया (Takalimiya), मुसळवाडी (Musalwadi), लाख (Lakh), जातप (Jatap), त्रिंबकपूर (Tribakpur), करजगाव (Karajgav), पिंपळगाव फुणगीसह (Pimpalgav Fugani) 32 गावांसाठी फक्त एक ब्रिटीशकालीन पोलीस चौकी (British police station) आहे. या चौकीमध्ये फक्त सहा पोलीस कर्मचारी (Police Workers) आहेत. 32 गावांतील सुमारे एक लाखाहून अधिक नागरिकांच्या सुरक्षा या सहा कर्मचार्‍यांच्या खांद्यावर आली आहे. पोलीसबळ कमी असल्याने गुन्हेगारी व अवैधधंदे वाढले आहेत. प्रवरा नदीचा (Pravara River) वाळूपट्टा (Sand) असल्याने वाळूतस्करीतून (Sand smuggling) टोळीयुध्द वाढले आहे. त्यातून गावठी कट्टे (Gavthi Katta) आले आहेत. देवळाली प्रवरासह (Deolali Pravara) लगतच्या गावांत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे पुन्हा एकदा स्वतंत्र पोलीस स्टेशनचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

देवळाली प्रवरा (Deolali Pravara) हे नगरपरिषद (Municipal Council) असलेले शहर आहे. नगरपरिषदेची (Municipal Council) लोकसंख्या 50 हजारांच्या जवळपास आहे. वरील 32 गावची लोकसंख्या सुमारे 30 ते 35 हजारांवर आहे. मात्र, त्यांची सुरक्षा रामभरोसे बनली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या देवळाली प्रवरासह (Deolali Pravara) श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील 32 गावांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन लवकर कार्यान्वित व्हावे, यासाठी आमदार लहू कानडे यांनी प्रयत्न करावेत, आम्ही त्यांना लागेल ती मदत करू, असे आवाहन शिवसेना शहराध्यक्ष सुनील कराळे (Shiv Sena city president Sunil Karale) यांनी केले आहे.

कराळे (Shiv Sena city president Sunil Karale) यांनी सांगितले, स्वतंत्र पोलीस स्टेशनची (police station) मान्यता मिळाली. त्यानंतर राज्यात अनेक स्थित्यंतरे झाली आणि हा प्रश्न आहे तसाच लोंबकळत पडला. मान्यता तर मिळाली परंतु पोलीस स्टेशनची कागदोपत्री मंजुरी लालफितीत अडकून पडली. मागील सरकारच्या काळात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर (Minister of State for Home Affairs Deepak Kesarkar) यांनी मंत्रालयात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले होते. या बैठकीला मी उपस्थित होतो. देवळाली प्रवरानंतर आश्वी (Ashwi), शिंगणापूर (Shignapur) याठिकाणी स्वतंत्र पोलीस स्टेशन झाले.

परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar) यांची जन्मभूमी असलेल्या गावी मात्र अद्याप स्वतंत्र पोलीस स्टेशन (Police Station) झाले नाही. आमदार कानडे (MLA Lahu Kanade)यांनी गांभिर्याने लक्ष घातले तर हा प्रश्न लवकरात लवकर सुटू शकतो. सध्या राज्यात तीनपक्षाचे आघाडी सरकार असल्याने आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोत. या कामी त्यांना आमची लागेल ती मदत आम्ही करण्यास तयार आहोत. आमदार कानडे (MLA Lahu Kanade) यांनी नागरिकांची सुरक्षितता म्हणून हा प्रश्न लवकर सोडवावा, असे कराळे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com