
देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara
देवळाली प्रवरा नगरपरिषदेची काल मंगळवार दि.21 जून रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी अजित निकत यांनी दिली.
निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचनेनुसार एकूण दहा प्रभाग तयार करण्यात आले असून नुकतेच प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागातून दोन व एका प्रभागातून तीन असे एकूण 21 नगरसेवक यंदा निवडून दिले जाणार आहेत. प्रारुप प्रभागनिहाय मतदार यादीमध्ये 22 हजार 828 मतदार संख्या असून त्यामध्ये 11 हजार 664 पुरुष मतदार व 11 हजार 183 स्री मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रभागनिहाय मतदार संख्या व मतदार पुढीलप्रमाणे :- प्रभाग क्र. 1 पुरुष मतदार - 1 हजार 459 - स्री मतदार - 1 हजार 409 - एकूण मतदार - 2 हजार 868,
प्रभाग क्र.2 पुरुष मतदार - 1 हजार 211 - स्री मतदार - 1 हजार 138 - एकूण मतदार - 2 हजार 349, प्रभाग क्र.3 पुरुष मतदार - 1 हजार 262 - स्री मतदार - 1 हजार 214 - एकूण मतदार - 2 हजार 476, प्रभाग क्र.4 पुरुष मतदार - 1 हजार 634 - स्री मतदार - 1 हजार 697 - एकूण मतदार - 3 हजार 331, प्रभाग क्र.5 पुरुष मतदार - 1 हजार 79 - स्री मतदार - 988 - एकूण मतदार - 2 हजार 67, प्रभाग क्र. 6 पुरुष मतदार - 1 हजार 280 - स्री मतदार - 1 हजार 218 - एकूण मतदार - 2 हजार 498, प्रभाग क्र. 7 पुरुष मतदार - 1 हजार 103 - स्री मतदार - 1 हजार 27 - एकूण मतदार - 2 हजार 130, प्रभाग क्र. 8 पुरुष मतदार - 1 हजार 150 - स्री मतदार - 1 हजार 123 - एकूण मतदार - 2 हजार 273, प्रभाग क्र.9 पुरुष मतदार - 988 - स्री मतदार - 919 - एकूण मतदार - 1 हजार 907, प्रभाग क्र. 10 पुरुष मतदार - 478 - स्री मतदार - 450 - एकूण मतदार - 928 याप्रमाणे मतदार संख्या आहे.
प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्वात कमी मतदार आहेत. त्यानंतर प्रभाग क्रमांक 9 मध्ये कमी मतदार आहेत. तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्वात जास्त मतदार संख्या आहे. या प्रभागात पुरुषांपेक्षा स्री मतदारांची संख्या जास्त आहे. त्या खालोखाल प्रभाग क्रमांक 1 मध्ये मतदार आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 व 4 बरोबरच प्रभाग क्रमांक 3 व 6 मध्ये उमेदवारांना या निवडणुकीत कस लागणार आहे. याआधी आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांना कही खुशी कही गम अशी अवस्था झालेली असतानाच आता प्रभाग प्रारुप यादी व मतदार संख्या जाहीर झाल्याने लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.